Maharashtra Pandharpur Crime News: एकतर्फी प्रेमातून हत्येच्या अनेक घटना घडल्याचं आपण ऐकलं आहे. अशीच एक घटना पंढरपुरात (Pandharpur Crime) घडली असून या घटनेनं केवळ पंढरपूरच नाहीतर संपूर्ण जिल्हा हादरला आहे. एकतर्फी प्रेमातून एका तरुणानं धारदार शस्त्रानं तरुणीच्या डोक्यात, पाठीवर, मानेवर वार केले आहेत. महाविद्यालयीन तरुणीची निर्घुण हत्या केली आहे. धक्कादायक प्रकार सांगोला तालुक्यातील कोळा येथे घडल्यानं खळबळ उडाली. 


पंढरपुरात (Pandharpur News) महाविद्यालयीन तरुणीची निर्घुण हत्या केल्यानं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सांगोला तालुक्यात (Sangola News) काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तरुणीच्या घराजवळच ही दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणात बळी गेलेली तरुणी ऋतुजा दादासाहेब मदने (वय 18 वर्ष) ही महाविद्यालयात शिक्षण घेत होती. या घटनेसंदर्भात मुलीचे मामा पांडुरंग दाजीराम सरगर यांनी संशयित सचिन मारुती गडदे यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. घटना घडल्यानंतर आरोपीनं पळ काढल्याची माहिती मिळत आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. 


नेमकं काय घडलं? 


एकतर्फी प्रेमातून पंढरपुरात एका 18 वर्षीय तरुणीची हत्या झाल्याची धक्कादायक घडना घडली आहे. ऋतुजा दादासाहेब मदने या तरुणीचा एकतर्फी प्रेमातून बळी गेला आहे. रात्री आठ वाजता तरुणीच्या घराजवळच आरोपीनं धारदार शस्त्रानं तिच्या डोक्यात, पाठीवर, मानेवर वार केले. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात मुलीच्या मामांनी पोलिसांत धाव घेत संशयित सचिन मारुती गडदे याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. घटनेपासूनच आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 


दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पंढरपूर विभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात यांनी  घटनास्थळी भेट देऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला. या प्रकरणातील संशयित सचिन गडदे याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


सैराटच्या पुनरावृत्तीने संभाजीनगर हादरलं, प्रेमसंबंधातून दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने केली हत्या