Solapur DJ death: सोलापूर शहरातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोलापुरात डीजेच्या तालावर नाचून थकलेल्या तरुणाचा चक्क हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अभिषेक बिराजदार असे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या खळबळजनक घटनेनंतर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात सदर घटनेची आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात ली आहे. मात्र या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेनं परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.


मिरवणुकीत नाचून दमला, छातीत दुखल्याने जागीच कोसळला


पुढे आलेल्या माहितीनुसार, अभिषेक बिराजदार या तरुणाचा मृत्यूच्या काही क्षणा अगोदरचा डीजेवर नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. यात मिरवणुकीत नाचून दमलेला तरुण काहीक्षण बाजूला थांबला आणि छातीत दुखल्याने जागीच कोसळला. त्यांनतर बेशुद्धावस्थेत त्याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यानिमित्ताने सोलापुरातील तासनतास चालणाऱ्या मिरवणूक आणि त्यातील कर्णकरकश्य डीजेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.


जळगाव शहरात मध्यरात्री चड्डी गॅंगचा धुमाकूळ! तीन मंदिरांसह घरातही चोरी


जळगाव शहरात मध्यरात्रीच्या वेळी मंदिरांचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी दोन मंदिरांमधून चांदीच्या पादुका, मूर्ती, दानपेटीतील रक्कम व इतर साहित्य चोरून नेले. तर तिसऱ्या मंदिरात त्यांच्या हाती काहीच न लागल्याने तेथून पेन ड्राईव्ह चोरून नेला. याशिवाय बाहेर गावी गेलेल्यांकडे घरफोडी केली. ही घटना मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास रायसोनी नगरात घडली.


एकाच रात्री चार ठिकाणी चोरी झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. रायसोनी नगरमध्ये श्री गजानन महाराज मंदिराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी 700 ग्रॅम चांदीच्या पादुका, गणपतीची दीड फुटाची धातूची मूर्ती तसेच दानपेटीतील रक्कम चोरून नेली. गेल्या अनेक दिवसांपासून ही दानपेटी उघडलेली नव्हती. त्यामुळे रक्कम किती होती, हे नेमके समजू शकलेले नाही. दरम्यान, मंदिर व घरामध्ये चोरी करणारे चौघेजण हे इतर राज्यातील असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चोरटे या परिसरातून फिरत असताना त्यांच्या हातात चॉपर, चाकू, तलवारी यासारखे शस्त्रदेखील होते, अशी माहिती या परिसरातील नागरिकांनी दिली.


इतर महत्वाच्या बातम्या