Solapur News : राज्यभरात म्हशीची खरेदी विक्री करणाऱ्या कुरेशी समाजाला गोरक्षकांकडून त्रास दिला जातं असल्याचा आरोप कुरेशी समाजाने केलाय. नुकतीच सोलापुरात (Solapur News) कुरेशी समाजाची बैठक संपन्न झाली. या बैठकीला माजी आमदार नरसय्या आडम (Narasayya Adam) यांची हि उपस्थिती होती. दरम्यान येत्या 7 ऑगस्ट गुरुवारी कुरेशी समाजातर्फे (Qureshi Community) सोलापुरात मूक मोर्चाची घोषणा करण्यात आली आहे. म्हशींच्या खरेदी-विक्रीवेळी गोरक्षकांकडून दिल्या जाणाऱ्या त्रासाचा विरोधात हा मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितलं जातंय.
कायद्यात म्हशीचा समावेश नाही, तरी देखील कुरेशी समाजाला त्रास- नरसय्या आडम
पुढे आलेल्या माहितीनुसार, मागील 15 दिवसापासून राज्यभरात म्हशीची खरेदी विक्री, मटण विक्री देखील बंद करत कुरेशी समाजाचे काम बंद आंदोलन सुरूय. त्यानंतर सोलापुरात पार पडलेल्या या बैठकीत आंदोलन तीव्र करण्याची भूमिका समाजाच्यावतीने घेण्यात आलीय. त्यासाठी येत्या 7 ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढणार असल्याची माहिती कुरेशी समाजाचे प्रदेशाध्यक्ष हाजी अय्युब कुरेशी यांनी दिली. दरम्यान राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा असला तरी या कायद्यात म्हशीचा समावेश नाही, तरी देखील कुरेशी समाजाला त्रास होतो. या विरोधात आम्ही कुरेशी बांधवाच्या सोबत आहोत, सोलापुरात मोर्चा होतोय, त्यानंतर आम्ही आंदोलन तीव्र करू, अशी प्रतिक्रिया माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिली.
विविध मागण्यासाठी परभणीत कुरेशी समाज उतरला रस्त्यावर
परभणीत जमियत उल कुरेश समाज विकास मंडळाच्या वतीने नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढुन धरणे आंदोलनही करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कुरेशी समाज या मोर्चात सहभागी झाला होता. परभणी शहरातील खाटीक समाजाला देण्यात आलेले कत्तल परवाने त्वरीत नुतणीकरण करुन देण्यात यावेत, धार रोड परभणी येथील कत्तलखाना अद्यावत करुन देण्यात यावा, तात्पुरत्या स्वरुपात केलेल्या कत्तलखान्याच्या ठिकाणी कायमस्वरुपी पशुवैद्यकीय अधिकारी यांची व्यवस्था करावी, कत्तलखाना येथे मांस कापल्यानंतर ते विक्री करण्यासाठी आणखी दोन नवीन मार्केट बांधून द्यावेत, यासह विविध मागण्या जिल्हाधिकारी यांना निवेदना द्वारे देण्यात आल्या आहेत.
आणखी वाचा