Raj Thackeray नवी मुंबई : शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन सोहळ्या बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यातील डान्सबारचा मुद्यावर भाष्य केलं होतं. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात पनवेल (Panvel News) मधील लेडीज बारचा हि उल्लेख केला होता. छत्रपती शिवरायांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्यात सर्वाधिक डान्सबार असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी भर सभेत खेद व्यक्त केला होता.

Continues below advertisement

दरम्यान, याच मुद्यावरून आता मनसैनिक आक्रमक झाले आहे. पनवेलमध्ये सुरु असलेल्या लेडीज बारमध्ये मनसेने तोडफोड करत मनसेचा 'खळ खट्याक' पद्धतीचा पवित्रा घेतला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार जयंत पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनी दिलेल्या निमंत्रण सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी का (3 ऑगस्ट) उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी रागड जिल्ह्यातील लेडीज बारचा उल्लेख केला होता. शिवाय येथील तरूण डान्स बारमुळे बरबाद होत असल्याचाहि भाषणात उल्लेख केला होता. अशातच आता राज ठाकरे यांनी डान्स बार बाबत केलेल्या टिकेनंतर पनवेल मधील मनसे कार्यकर्त्यांनी कोनगाव (पनवेल ) मधील नाईट राईड डान्स बारची तोडफोड केली आहे.

नेमकं काय म्हणाले होते राज ठाकरे?

रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला जिल्हा. महाराजांचा राज्यकारभार ज्या किल्ल्यांवरून चालला त्या किल्ल्यावरून या जिल्ह्याला नाव पडले. असे असताना रायगडची ओळख आता डान्सबारचा जिल्हा अशी होऊ लागल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती. या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या थडग्यावरती उद्योग उभे राहू देणार नाही. उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मानसन्मान ठेवूनच ते उद्योग इथे आणावे लागतील. त्याशिवाय तुम्हाला ते आणता येणार नाहीत. कोण कुठे येतो आणि काहीही करतो, पत्ताच लागत नाही.

Continues below advertisement

या संपूर्ण राज्यामध्ये कोणत्या प्रकारची प्रगती होते, कुठून रस्ते निघणार आहेत, काय निघणार आहेत, फक्त मंत्र्यांना माहिती आहेत. आज रायगड जिल्ह्यात अनेक प्रकल्प येत आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत. उद्योगधंद्यांसाठी लागणारं मनुष्यबळ बाहेरच्या राज्यातून येत आहे. त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगार नाही, हे विदारक चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. एखाद्या प्रदेशात रस्ते आल्यानंतर तेथील राज्यकर्त्यांनी नीट लक्ष दिलं नाही तर तो प्रदेश बरबाद होतो. त्याचं उदाहरण म्हणजे राजगड जिल्हा होय, असेही राज ठाकरे म्हणाले.

आणखी वाचा

महाराष्ट्रात राज्याचा मुख्यमंत्री हिंदी कशी आणता येईल याचा विचार करतो, मी हिंदी भाषिक नाही गुजराती असल्याचे देशाचा गृहमंत्री सांगतो, मग आम्ही बोललो की संकुचित कसे? राज ठाकरेंचा प्रहार