Horoscope Today 3 August 2025 : वैदिक पंचांगानुसार, आज 3 ऑगस्ट 2025, आजचा वार रविवार आहे. आजचा दिवस हा सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण नुकताच श्रावण मासारंभ झाला आहे. आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

शिल्लक कारणावरून वाद वाढवण्याची प्रवृत्ती राहील त्यामुळे येणारा राग काबूत ठेवावा लागेल.    

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

संततीच्या बाबतीत दोन पिढ्यांमधील तफावत जाणवेल त्यामुळे त्यांच्या मताचाही आदर करावा लागेल. 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मनाविरुद्ध घडणाऱ्या घटना थोड्या अस्वस्थ करतील परंतु अशावेळी इष्ट देवतेची उपासना तुम्हाला मनशांतीकडे घेऊन जाईल. 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

स्वतंत्र आचार विचाराची आवड निर्माण झाल्यामुळे कोणाच्याही तंत्राने चालणार नाही आर्थिक दृष्ट्या कोणती महत्त्वाची उलाढाल करू नये.

सिंह रास (Leo Horoscope Today)

स्त्रियांना घरातील व्यक्तींशी मिळते जुळते घ्यावे लागेल त्यामुळे कोणत्याही प्रसंगात तुमच्या स्वभावात थोडा चिरचिरेपणा राहील.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कोणताही निखळ आनंद तुम्ही उपभोग होऊ शकत नाही ही गोष्ट लक्षात ठेवून एखादी गोष्ट किती मनावर घ्यायची याचा विचार करायला लागेल.

तूळ रास (Libra Horoscope Today)

व्यवसाय धंद्यामध्ये काहीतरी ठोस बदल करावेसे वाटतील हाताखाली काम करणाऱ्या कामगारांच्या लहरी स्वभावाला तोंड द्यावे लागेल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

कलाकारांना आपली कला समाजासमोर सादर करण्यासाठी वेगळ्या पद्धतीचा अवलंब करावा लागेल. 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

कोणत्याही कामांमध्ये दिरंगाई झाली तरी ते पूर्ण होईल याची खात्री बाळगा विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

प्रेम प्रकरणांना तडजोडीतून यश मिळेल महिलांवर आधुनिक विचारांचा पगडा राहील.

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

आज स्वतःबरोबर इतरांचीही काळजी घ्याल त्यामुळे जवळच्या लोकांचे तुमच्या शिवाय पान हलणार नाही.

मीन रास (Pisces Horoscope Today)

तुमच्या काही नवीन योजना संबंधित लोकांच्या समोर मांडाल परंतु त्यामुळे थोडी संघर्षात्मक परिस्थिती निर्माण होईल.

हेही वाचा :       

Numerology : लग्नसंस्था, नको गं बाई! लग्नाच्या नावानेच दूर पळतात 'या' जन्मतारखेचे लोक; कितीही मागे लागा, शेवटी आपलंच करतात खरं