सोलापूर : हिंदू जन आक्रोश मोर्चादरम्यान (Hindu Jan Aakrosh Morcha) प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rana) आणि तेलंगणातील भाजप आमदार टी.राजा (T.Raja) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोन्ही नेत्यांनी भाषण्यादरम्यान धार्मिक तेढ वाढवणारी वक्तव्ये केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. दरम्यान, चितावणीखोर वक्तव्य दोन्ही नेत्यांनाच चांगलीच भोवली आहेत. या प्रकरणी सोलापुरातील (Solapur) जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. 


पोलिसांनी नोटीस बजावूनही केली आक्षेपार्ह वक्तव्ये 


पोलिसांनी नितेश राणे आणि  टी राजा सिंग यांना तेढ निर्माण होईल, अशी आक्षेपार्ह वक्तव्य करू नये. या आशयाची नोटीस बजावली होती. तरिही टी. राजा. सिंग आणि नितेश राणेंनी प्रक्षोभक वक्तव्यांची मालिका सुरुच ठेवली आहे. सभेदरम्यान नितेश राणे आणि  टी राजा सिंग यांनी कोणताही आक्षेपर्ह वक्तव्य केलं असेल तर त्यांची तपासणी करून रीतसर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया पोलिसांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. 


काय आहे संपूर्ण प्रकरण? 


सोलापुरात वक्फ बोर्ड  कायदा (Waqf Board Act) रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चादरम्यान भाजप आमदार नितेश राणे आणि तेलंगणातील भाजप आमदार टी राजा सिंग हे देखील उपस्थित होते. सोलापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कन्ना चौकपर्यंत हा मोर्चा निघाला होता. 


दोन दुकानांवर दगडफेक 


मात्र हा मोर्चा मधला मारुती परिसरात मोर्चा आल्यानंतर काही दुकानांची अज्ञात लोकांनी तोडफोड केली. तर काही जण दगडफेकीमुळे जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थवरून सतीश शिंदे आणि शेखर स्वामी या दोघांना ताब्यात घेतलेलं होतं. रात्री उशिरा या दोघाना अटक करून अन्य 12 ते 15 अनोळखी आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 


 12 ते 15 जणांविरोधात गुन्हा दाखल, दोन जणांना अटक


दोन्ही आमदारांसह सकल हिंदू समाज समन्वयक सुधीर बहिरवडे आणि मंचावर उपस्थित 8 ते 10 पदाधिकाऱ्यांवर झाला आहे. या संपूर्ण प्रकरणात 12 ते 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 
भारतीय दंड संहिता विधेयक कलम 153(अ),295(अ),188,34 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वक्फ बोर्डाच्या जमिनीवरून नितेश राणेंची टीका


वक्फ कायदा हा केवळ आपल्या देशात आहे, असा कायदा कोणत्याही इतर समाजासाठी नाही, इतकंच काय कुठल्याही इस्लामिक देशात ही कायदा नाही. आपल्या देशात जेवढी जमीन रेल्वे आणि सैन्याची नाही तेवढी जमीन वक्फ बोर्डाने घेऊन ठेवली आहे. देशातील तिसऱ्या क्रमांकची जमीन कोणाकडे असेल तर ती वक्फची आहे. जिथे अशी जमीन वक्फची म्हणून मागायला येतील तिथे तुम्ही विरोध करून उभे राहिला तर राज्य आणि केंद्र सरकार तुमच्या मागे राहील. 


इतर महत्वाच्या बातम्या 


सोलापुरातील हिंदू जन आक्रोश मोर्चादरम्यान दोन दुकानांवर दगडफेक; 12 ते 15 जणांविरोधात गुन्हा दाखल, दोन जणांना अटक