Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनाची तारीख जवळ येत आहे. 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) या भव्य मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. देश-विदेशातील रामभक्त या शुभ सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. राम मंदिराच्या उभारणीचा संपूर्ण अयोध्या शहरावर सकारात्मक परिणाम झाला आहे. येथे सर्व प्रकारच्या व्यवसायांची भरभराट झाली आहे. प्रगतीच्या या प्रवासात शहरातील रिअल इस्टेट क्षेत्रही भागीदार झाले आहे. अयोध्येतील मालमत्तेच्या किमती उत्तर प्रदेशातील इतर शहरांच्या तुलनेत खूप वेगाने वाढल्या आहेत. येथील जमिनींचे भाव जवळपास चौपट वाढले आहेत.


अयोध्येत राम मंदिराव्यतिरिक्त नवीन स्टेशन आणि विमानतळ तयार आहे. तसेच अनेक विकास प्रकल्पांची कामे सुरू आहेत. अशा परिस्थितीत रिअल इस्टेट क्षेत्रातील मागणी अनेक पटींनी वाढली आहे.


मालमत्तेच्या किमतीत चौपट पेक्षा जास्त 


प्रॉपर्टी मार्केट तज्ज्ञांच्या मते रिअल इस्टेट क्षेत्रातील ही तेजी आता थांबणार नाही. अयोध्येतील लोकांना केवळ स्थानिक लोकांकडूनच नाही तर बाहेरील लोकांकडूनही मालमत्ता खरेदी करण्याच्या ऑफर येत आहेत. राम मंदिरामुळं अनेक प्रकारची हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सही शहरात आली आहेत. यामध्ये ताज आणि रॅडिसनसारख्या मोठ्या हॉटेल चेनचाही समावेश आहे. या मोठ्या खरेदीदारांमुळेच मालमत्तेच्या किंमतीत कमालीची वाढ झाली आहे.


अयोध्येभोवती बांधकाम सुरु 


एनरॉक रिसर्चनुसार, राम मंदिराच्या आसपासच्या किमती अनेक पटींनी वाढल्या आहेत. आता बाहेरच्या भागातही स्वस्त जमीन कुठेच मिळत नाही. अहवालानुसार, 2019 मध्ये ज्या भागात जमिनीचा भाव 1000 ते 2000 रुपये प्रति चौरस फूट होता, तिथे आता जमीन 4000 ते 6000 रुपये प्रति चौरस फूट दराने उपलब्ध आहे. शहराच्या सीमेवर असलेल्या फैजाबाद रोडवर मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. 2019 मध्ये येथील जमिनीचा भाव 400 ते 700 रुपये प्रति चौरस फूट होता, तो आता 1500 ते 3000 रुपये प्रति चौरस फूट झाला आहे.


बड्या बिल्डरकडून गृहनिर्माण प्रकल्पाला सुरूवात 


तज्ज्ञांच्या मते, अयोध्येतील राम मंदिराव्यतिरिक्त नवीन स्टेशन आणि विमानतळाचे काम पूर्ण झाले आहे. 30 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचे उद्घाटन करण्यात आले. स्टेशन्स आणि विमानतळांजवळील भागातही किमतीत मोठी वाढ झाली आहे. अभिनंदन लोढा यांनी जानेवारीतच अयोध्येत 25 एकरांची निवासी योजना सुरू केली आहे.


सरकारकडून पायाभूत सुविधांवरही खर्च 


राम मंदिरासोबतच सरकार अयोध्येत अनेक मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर काम करत आहे. अयोध्येला धार्मिक पर्यटनाचे मोठे केंद्र बनवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राम मंदिराच्या उभारणीचे जगभर आकर्षण आहे. यामुळे गुंतवणूकदार एक चांगला गुंतवणूक पर्याय म्हणून याकडे पाहत आहेत.


अयोध्येत 'श्री राममंदिर'  ( उभारणीला सुरुवात झाली तेव्हापासून या शहराच्या विकासात (Development) मोठी भर पडली आहे. अयोध्येच मोठ्या प्रमाणात विकासाची कामं सुरु आहेत. दरम्यान, सध्या लोक 22 जानेवारीची वाट पाहत आहेत, त्या दिवशी 'श्री रामजन्मभूमी मंदिर'चे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहेत. लोक याकडे प्रभू रामाचे अयोध्येतील पुनरागमन म्हणूनही पाहत आहेत. पण खर्‍या अर्थाने केवळ श्रीरामच 'राममंदिरात परतणार नाहीत, तर याचबरोबर अयोध्येत 85,000 कोटी रुपये येणार आहेत. नेमकी संपूर्ण योजना काय? ते सविस्तर पाहुयात. 


धार्मिक पर्यटनाला चालना


अयोध्येत सुरू होणारे राम मंदिर हे देशातील कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेचे केंद्र तर आहेच, शिवाय या प्रदेशाच्या विकासासाठी आणि अर्थव्यवस्थेसाठीही ते विशेष आहे. राम मंदिरामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. यामुळेच पायाभूत सुविधांपासून ते हॉस्पिटॅलिटी, एफएमसीजी क्षेत्रापर्यंतच्या कंपन्या या क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


अयोध्येत फक्त श्रीरामच येणार नाहीत, तर 85 हजार कोटी रुपयेही येणार; काय आहे योजना?