Vibhav Naik on Shinde Group Dasara Melava: शिंदे गटानं (Shinde Group) दसरा मेळावा (Dasara Melava 2023) घेऊ नये आणि घ्यायचाच असेल तर तो भाजपच्या (BJP) कार्यालयात घ्यावा, अशी टीका ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) यांनी केली आहे. मोदी (PM Modi) शाहांचा (Amit Shah) मोठेपणा गाणाऱ्यांना शिवसेनेचे (Shiv Sena) विचार मांडण्याचा कुठलाही अधिकार नाही. यांच्या हातात आता पक्षाची ध्येय, धोरणं राहिली नाहीत तर ती भाजपच्या हातात असून शिंदे गटाची भूमिका भाजप ठरवणार अशा शब्दात वैभव नाईक यांनी शिंदे गटाचा समाचार घेतला आहे. 


शिंदे गटानं दसरा मेळाव्याऐवजी मोदींची सभा घ्यावी : वैभव नाईक 


शिंदे गटानं दसरा मेळावा घेण्यापेक्षा मोदींची सभा घ्यावी, भाजपमध्ये तुमचा पक्ष विलीन होणार आहे. शिवसेनेमध्ये अडथळे आणण्यासाठी शिंदे गटाचा वापर केला जातो. यांच्या मेळाव्याला गर्दी कशी होते? कोण उत्तर भारतीय होते? कोण बिहारी होते? भाषण करताना काही लोक उठून गेले, हे सगळ्यांनी पाहिलं आहे. शिवतीर्थावर एकही रुपया न देता जी गर्दी होते, ते शिवसेनेच्या विचारांचं सोन लुटायला येतात, मात्र तुमची गर्दी विचारांची नसते, असं म्हणत वैभव नाईकांनी शिंदे गटाला सणसणीत टोला लगावला आहे. 


पाहा व्हिडीओ : 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कात? शिंदेंचा दसरा मेळावा क्रॉस, ओव्हल मैदानावर होणार असल्याची, मंत्री केसरकरांची माहिती