Sindhudurg Submarine Project सिंधुदुर्ग: राज्यातील बहुचर्चित पाणबुडी प्रकल्प (Submarine Project)च्या पहिल्या टप्यातील कामाला वेंगुर्ले बंदरात सुरुवात झाली आहे. वेंगुर्ले बंदर आणि मांडवी खाडीच्या संगमावर बंधारा बांधण्यात येत आहे. याचं बंधाऱ्यावरून पुढे समद्रात जाण्यासाठी बंदर विकसित केलं जाणार आहे. आणि या बंदरातून निवती रॉक येथे होणाऱ्या पाणबुडी प्रकल्पासाठी प्रवासी बोटी सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे पाणबुडी प्रकल्पाच्या पहिल्या टप्यातील बंधाऱ्याच काम सुरू झालं असून याचा फायदा मच्छीमार आणि पर्यटन व्यवसायिकांना होणार आहे.
पाणबुडी प्रकल्पावरून राज्याच्या राजकारणात वाद पेटला होते. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर या प्रकल्पावरून टीका केली होती. प्रकल्पासाठी पैसे देऊन देखील तत्कालीन पर्यटन मंत्र्यांनी अडीच वर्षात प्रकल्पाला मंजुरी दिली नाही. यावरून दोन्ही बाजूंनी हेवेदावे देखील करण्यात आले. कोणी हा प्रकल्प गुजरातला पळवला म्हणून दावा केला तर कोणी हा पकल्प होणार असा दावा केला. त्यामुळे कोकणातल्या पर्यटनाला एक वेगळा आयाम देणारा हा बहुचर्चित पाणबुडी प्रकल्पाच्या पहिल्या ट्प्यातील कामाला सध्या तरी सुरवात झाली आहे. ब्रेक वॉटर बंधाऱ्याचे काम सुरू झाले असून त्यानंतर या ठिकाणी प्रवासी जेटी बांधण्यात येणार आहेत. आणि याचं जेटी वरून पाणबुडी प्रकल्पाच्या ठिकाणी निवती रॉक या ठिकाणी प्रवासी बोटी सोडण्यात येणार आहेत. तसेच स्कुबा डायव्हिंग साठी देखील या ठिकाणाहून बोटी सोडण्यात येतील, त्यामुळे खऱ्या अर्थाने वेंगुर्ल्याच्या पर्यटन व्यवसायात मोठी भर पडणार आहे.
पाणबुडी प्रकल्प सुरू करून प्रवासी बोटी सोडण्यात येणार
ब्रेक वॉटर बंधारा हा एक मोठा प्रकल्प असून याला सलग्न असा वेंगुर्ले नवीन जेटी असा मिळून साधरण दोन्ही कामांसाठी ३५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. ब्रेक वॉटर बंधाऱ्याचे काम सुरू झाले आहे. ब्रेक वॉटर बंधारा आणि प्रवासी जेटी बांधून जेव्हा पूर्ण होईल. त्यानंतर या ठिकाणावरून निवती रॉक येथील राज्यातील बहुचर्चित पाणबुडी प्रकल्प सुरू करून प्रवासी बोटी सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे पाणबुडी प्रकल्पासाठी पहिल्या टप्यातील बंधाऱ्याचे काम सुरू झाले आहे. वेंगुर्ले बंदर आणि मांडवी खाडी संगमावर बांधण्यात येत असलेल्या बॅक वॉटर बंधाऱ्यामुळे मांडवी खाडीत मोठ्या प्रमाणात पर्यटनाला चालना मिळणार आहे. सोबत वेंगुर्ले बंदरात मासेमारी करणाऱ्या नौकाना तीन तीन तास समुद्राला येणाऱ्या भरतीची वाट पाहत बसावं लागत होत. ते आता बंद होऊन या मासेमारी नौका मांडवी खाडीत ये जा करू शकणार आहेत.
मच्छिमारांना या प्रकल्पामुळे होणार फायदा-
पर्यटनासोबत मच्छिमारांना देखील या प्रकल्पामुळे मोठा फायदा होणार आहे. समुद्रात होणाऱ्या वादळ सदृश्य परिस्थितीतीत कोकणात देवगड बंदर सोडून इतर कोणतेही बंदर मासेमारी नौका लावण्यासाठी सुरक्षित नाही. मात्र या प्रकल्पामुळे वेंगुर्ले बंदर हे देवगड बंदरा नंतर दुसरं सुरक्षित बंदर होणार आहे. त्यामुळे ज्यावेळी वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते त्यावेळी मासेमारी नौका मांडवी खाडीत येऊ शकतात. तसेच या बॅक वॉटर बंधाऱ्यामुळे वेंगुर्ले बंदर समुद्रातून पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. नवाबाग समुद्र किनाऱ्यावरून हा बॅक वॉटर बंधारा बांधण्यात येत असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले वेंगुर्ले बंदर समुद्रातून न्याहाळता येणार आहे.