कणकवली:  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामध्ये काही दिवसांपूर्वी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुण-तरुणीने धरणात उडी मारून (Kankavli Youth Couple death) जीवन संपवल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. त्या घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे दोघे एकमेकांवर प्रेम करत होते. तसेच आता या संदर्भात पोलिसांनी केलेल्या तपासामधून अनेक खुलासे समोर आले आहेत. हरवलेल्या मोबाईलमुळे आपल्या खाजगी गोष्टी आणि माहिती कोणाच्या हाती  (Kankavli Youth Couple death)लागली तर आपली बदनामी होईल, या भीतीतून या दोघांनी टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. जीवन संपवण्याबाबतचे व्हॉट्सअॅप चॅट तसेच पोलीस तपासामधून ही माहिती समोर आली आहे. (Kankavli Youth Couple death)

Continues below advertisement

Sindhudurg Kankavli Youth Couple death: आईच्या मोबाईलमधून व्हॉट्सअॅपवरून ईश्वरी सोबत चॅट

मिळालेल्या माहितीनुसार, कणकवली तालुक्यातील कलमठ कुंभारवाडी येथील सोहम चिंदरकर आणि कणकवली शहरातील बांधकरवाडी येथील ईश्वरी राणे या प्रेमीयुगलाने तालुक्यातील तरंदळे येथील धरणात उडी मारून जीवन संपवले होते. हे टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी सोहम हा त्याचा हरवलेला मोबाईल शोधत होता, अशी माहिती समोर आली होती. त्यानंतर त्याने आईच्या मोबाईलमधून व्हॉट्सअॅपवरून ईश्वरी सोबत चॅट केलेलं आढळून आलं आहे. दरम्यान, या संभाषणामधून या प्रकरणाचे महत्त्वाचे खुलासे समोर आले आहेत.

Sindhudurg Kankavli Youth Couple death: ईश्वरीने सोहमची खूप समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण...

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ज्या दिवशी ही घटना घडली, त्याआधी सोहमने ईश्वरीला आईच्या फोनवरून व्हॉट्सअॅपवरती अनेक मेसेज केले होते. ‘माझा मोबाईल हरवला आहे. त्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ आहेत.  हा मोबाईल कोणाच्या हाती लागला तर माझी खूप बदनामी होईल. त्यामुळे मी जीवन संपवत आहे, असे सोहमने ईश्वरीला केलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे. त्यानंतर ईश्वरीने सोहमची खूप समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांच्यात झालेल्या चॅटिंगमधून दिसून आलं आहे. पण जीवन संपवण्याच्या निर्णयावर ठाम असलेला सोहम हा ऐकण्याचा मन:स्थितीत नव्हता. समजून सांगून देखील सोहमने ऐकलं नाही, त्यानंतर तुझ्याशिवाय मी तरी एकटी कशी काय जगू? असा प्रश्न ईश्वरीने केला. त्यानंतर आपण दोघेही एकत्र जीवन संपवूया, असे सोहमला सांगितले, ही माहिती या दोघांनध्ये झालेल्या शेवटच्या चॅटिंगमधून समोर आली आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

Continues below advertisement

दरम्यान, त्यानंतर या दोघांनीही जवळच असलेल्या तरंदळे येथील धरणाच्या पाण्यात उडी मारून जीवन संपवले. दोघेही घरातून बेपत्ता असल्याने शोधाशोध करत असलेल्या कुटुंबीयांना मेसेजच्या आधारावर जेव्हा शोध घेतला तेव्हा त्यांचे मृतदेह धरणाच्या पाण्यात तरंगताना आढळले होते. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.