Ashadhi Ekadashi 2022 : आज आषाढी वारी  (Ashadhi Ekadashi)आहे. या वारीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. पंढरपूरमध्ये वारकऱ्यांचा जनसागर लोटला आहे. सर्वजण भक्तीसागरात तल्लीन झालं आहेत. या आषाढी वारीनिमित्त अनेक कलाकार विठ्ठलाची कलाकृती साकारत आहेत. तळकोकणातील कुडाळ पाट गावातील चित्रकार अल्पेश घारेने एका कातळ दगडावर 40 फुट विठ्ठलाची रांगोळी साकारली आहे. ही विठ्ठलाची कलाकृती पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.




'ठायी ठायी विठ्ठल, ठायी ठायी पंढरी' या पंक्तीप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील चित्रकार अल्पेश घारे यांनी आषाढी एकादशीचा अवचित्य साधून विठ्ठलाचे दर्शन देणारी 40 फुट एवढी मोठी रांगोळी काढली आहे. वेंगुर्लेतील म्हापन गावात कातळ दगडावर ही कलाकृती साकारली आहे. ही रांगोळी साकारायला त्याला तीन तासाचा अवधी लागला. चित्रकार अल्पेश घारे याने ही रांगोळी वारकरी आणि पंढरीच्या वारीला समर्पित केली आहे.




मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सपत्निक केली विठ्ठलाची महापूजा


आषाढी एकादशी चा राज्यभर उत्साह आहे. आषाढीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपुरात विठुरायाची महापूजा पार पडली. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची ही महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही पहिलीच महापूजा पार पडली आहे. पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी ही शासकीय महापूजा पार पडली आहे. महापूजेनंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यातील शेतकरी, वारकरी, कष्टकरी, समाजातील सर्व घटकांना सुखाचं आनंदाचं समृद्धीचं जावो, कोविड संकट कायमस्वरुपी जावं. राज्यावरील संकटं, सगळ्या अडचणी दूर होवो. राज्यातील बळीराजा, कष्टकरी, समाजातील प्रत्येक घटकांना सुख समृद्धी मिळो. राज्याची प्रगती व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा. गोरगरीब सामान्यांच्या जीवनात चांगले दिवस यावेत, यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न असेल. राज्याला कृषी, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रात चांगलं यश मिळो अशी प्रार्थना आहे. माझ्यासाठी आजचा दिवस भाग्याचा आहे. हा दिवस मी कदापी विसरु शकणार नाही, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.


महत्वाच्या बातम्या: