Sindhudurga Waterfall : तळकोकणात उंच कड्यावरून गर्द वनराईत दाट धुक्यातुन वाट काढत 150 फुटांवरून पांढरा शुभ्र फेसाळत कोसळतोय मांगेलीचा धबधबा. 150 फुटांवरून कोसळणारा धबधब्याच्या मुळात जाण्यासाठी डोंगरात ट्रेकिंगचा आनंदही लुटता येतो. धबधब्याच्या मुळाशी न जाताही 150 फुटांवरून कोसळणाऱ्या पाण्याचे तुषार धबधब्याच्या परिसरात 500 मीटरच्या परिसरात हे पाण्याच्या तुषारांनी आपोआप भिजण्याचा आनंद घेता येतो. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकाच्या सीमेवर असलेला दोडामार्गातील मांगेलीचा धबधब्याचं निसर्ग सौंदर्य पर्यटकांना मोहवून टाकते. गर्द वनराईतील हा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो. आंबोली इतकाच निसर्गरम्य असलेला दोडामार्गातील मांगेली येथील धबधब्याला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची पसंती मिळते.
दोडामार्गमधील मांगेली गावात गेल्यानंतर मांगेलीचा हा धबधबा आपल्या दृष्टीक्षेपात येतो. या धबधब्यापर्यंत जाण्यासाठी जंगलातून ट्रेकिंग करत झाडे झुडपातून वाट काढत जावं लागतं. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या तिन्ही राज्यातील पर्यटक मोठ्या संख्येने धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी आणि ट्रेकिंगचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने मांगेलीच्या धबधब्यावर पर्यटक येत असतात.
ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासन यांनी गावात धबधब्यापर्यंत पर्यटकांना जाण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध केले आहेत. पोलीस प्रशासन पर्यटकांना योग्य त्या सूचना तसेच मार्गदर्शन करताना पाहायला मिळतं. तीन राज्यांच्या सीमेवर असलेला हा धबधबा असल्याने निसर्गाच्या सानिध्यात पर्यटक मोठ्या संख्येने आनंद लुटतात.
साहसी पर्यटकांना मांगेलीचा हा धबधबा नेहमीच पर्यटकांना खुणावत असतो. रस्त्यापासून मुख्य धबधब्यापर्यंत पाचशे ते सातशे मीटर पर्यंत डोंगरात दगडातून आणि झाडीझुडपीतून वाट काढत ट्रेकिंगचा अनुभव घेत मांगेलीच्या या मुख्य धबधब्यापर्यंत पर्यटकांना पोहोचता येतं. त्यामुळेच नेहमी साहसी पर्यटक या ठिकाणी वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मांगेलीच्या धबधब्याजवळ येत असतात. आंबोलीपेक्षाही सुरक्षित असा हा मांगेलीचा धबधबा असल्याने मोठ्या संख्येने पर्यटकांमुळे गजबजून गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.