Konkan Railway Time Table: कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आजपासून (21 ऑक्टोबर) कोकण रेल्वे मार्गावर बिगर पावसाळी वेळापत्रक (Konkan Railway Time Table) लागू होणार असून रेल्वे गाड्या जलद धावण्यास सुरुवात होणार आहे. पावसाळ्यामध्ये कोकण रेल्वेकडून पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात येऊन सर्वच गाड्यांचा वेग कमी करण्यात येतो. कोकण रेल्वे मार्गावर दरडी कोसळण्याची भीती लक्षात घेवून हा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येत असतो.

Continues below advertisement

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पावसाळ्यात हा वेग कमी करण्यात आला होता. मात्र आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावरील प्रवास गतीमान होणार आहे. दरवर्षी 10 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यान कोकण रेल्वेवर पावसाळी वेळापत्रक लागू केले जाते, परंतु यंदा पूर्व पावसाळी कामे वेळेवर पूर्ण झाल्यामुळे 15 दिवस लवकर पावसाळी वेळापत्रक संपविण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रवाशांना कोकण रेल्वे मार्गावर जलद प्रवास करता येणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्यांच्या चार जलद गाड्यांना थांबा- (Konkan Railway New Time Table)

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन कुमार वैष्णव यांनी मंत्री नितेश राणे यांची लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना सिंधुदुर्गात थांबा देण्याची मागणी मान्य केली आहे. त्यानुसार ओरोस आणि कणकवली रेल्वे स्थानकांवर चार लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्डाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार हा निर्णय लागू करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग स्थानकावर एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस आणि एर्नाकुलम – अजमेर मरुसागर एक्सप्रेस या दोन गाड्यांना थांबा देण्यात आला आहे. तर कणकवली स्थानकावर, हिसार – कोयंबतूर एक्सप्रेस आणि गांधीधाम – नागरकोइल एक्सप्रेस या दोन गाड्यांना थांबा देण्यात आला आहे.

Continues below advertisement

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO: