सिंधुदुर्ग :  नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj)   शौर्याला सलाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा दुर्दैवानं कोसळला आहे. यामागचं कारण अजून कळू शकलेलं नाही. 4 डिसेंबर 2023  रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलं होतं.


आमदार वैभव नाईक म्हणाले, शिवाची महाराजांचा पुतळ हा निकृष्ट कामामुळे कोसळल आहे. याबद्दल आम्हाला दु:ख होत असून एक शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो.सहा महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून हा पुतळा उभरण्यात आला होता . ज्यावेळी काम सुरू होते  त्यावेळी स्थानिक लोकांनी सुद्धा कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. पण त्यावेळी पद्धतशीरपणे दुर्लक्ष केले. जे विरोध करत आहे करत आहेत  ते आपल्या विरोधात आहे असा समज करुन घेतला.  400 वर्षापूर्वी  उभारण्यात आलेल्या किल्ल्याचा एकही चिरा ढासळला नाही, पण सहा महिन्यांपूर्वी येथील कम ढासळले होते. या प्रकरणी दोषींवर गुन्हे झाले पाहिजे अन्यथा आम्ही जिल्ह्यात नाही तर राज्यभर आंदोलन करण्यात येईल.  तसेच सर्व शिवप्रेमींनी शांततेत आंदोलन करावे. 


पंतप्रधान मोदींच्या हस्ते डिसेंबर महिन्यात 35 फुटी पुतळ्याचे उद्धाटन


राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची हा पुतळा 35 फुटांचा होता. मालवणमधील तारकर्लीच्या समुद्रकिनारी नौदल दिनाच्या कार्यक्रमावेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण झाले होते.   हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना देशातील पहिल्या आरमाराचे जनक म्हणून ओळखले जातात.  भारतीय नौदलाने देखील आपल्या ध्वजावर शिवरायांची राजमुद्रा छापली आहे. या पार्श्वभूमीवर नौदलाच्या वतीने 4 डिसेंबर 2023 चा नौदल दिन छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निमित्ताने राजकोट किल्ल्यावर नौदल आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा  पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाला होता. 


कसा  होता मालवण येथील शिवाजी महाराज पुतळा?



  • किल्ले राजकोट परिसराचं सुशोभीकरण तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जमिनीपासून उंची सुमारे 43 फूट एवढी आहे

  • बांधकाम जमिनीपासून 15 फूट तर त्यावर 28 फूट उंच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असं स्ट्रक्चर आहे.

  • हा पुतळा नौसनेकडून उभारण्यात आला.

  • ज्याचं उद्घाटन 4 डिसेंबर 2023 रोजी, नौसेना दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले.

  • पुतळ्याची किंमत 2 कोटी 40 लाख 71 हजार एवढी रुपये एवढी होती.

  • कल्याणचा तरूण शिल्पकार आणि मालवणचा सुपुत्र जयदीप आपटे यांनी हे शिल्प बनवलं आहे.