मुंबई : येत्या 23 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थकसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पातील घोषणांचा परिणाम शेअर बाजारावरही होणार आहे. त्यामुळे या काळात कोणते शेअर्स खरेदी करावेत आणि कोणते शेअर्स विक्री काढावेत? असा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांना पडला आहे. दरम्यान, अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत असले तरी असे काही स्टॉक्स आहेत, जे सध्या तेजीत आहेत. आगामी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी हे शेअर्स चांगले रिटर्न्स देऊ शकतात.  


शनिवारी काही पेनी स्टॉक्सने चांगली कामिगी केली. काही पेनी स्टॉक्सना तर अपर सर्किट लागले. अपर सर्किट लागलेल्या काही स्टॉक्समध्ये 20 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. सोमवारी सत्र चालू झाल्यानंतरही हे स्टॉक्स चांगली कामगिरी करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यातील काही स्टॉक्सची नावे खाली दिली आहेत.


शर्मा ईस्ट इंडिया हॉस्पिटल


शर्मा ईस्ट इंडिया हॉस्पिटल या स्टॉकमध्ये शुक्रवारी 20 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. शुक्रवारी दिवसाअखेर हा स्टॉक 37.95 रुपयांवर पोहोचला. Sharma East India Hospitals and (SHMA) या शेअरमध्ये सोमवारीही तेजी पाहायला मिळू शकते.


लॅडरअप फायनान्स 


शुक्रवारी बाजार चालू असताना Ladderup Finance या शेअरमध्ये 20 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. दिवसाअखेर  हा स्टॉक 45.40 रुपयांवर पोहोचला. अजूनही अनेकजण हा शेअर खरेदी करत असून सोमवारीदेखील हा शेअर चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे.


बीटूबी सॉफ्टवेअर टेक


शुक्रवारी B2B Software Tech या कंपनीच्या शेअरमध्ये चांगली तेजी पाहायला मिळाली. हा शेअर शुक्रवारी दिवसाअखेर 37.00 रुपयांवर पोहोचला. या स्टॉकने खरेदीदारांचे लक्ष वेधून घेतले असून सोमवारीदेखील हा स्टॉक चांगली कामगिरी करू शकतो. 


एकेजी एक्झिम 


शुक्रवारी ट्रेडिंग सेशनमध्ये AKG Exim या शेअरमध्ये 20 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. हा शेअर शुक्रवारी दिवसाअखेर 24.24 रुपयांपर्यंत पोहोचला. सोमवारीदेखील हा शेअर चांगली कामगिरी करू शकतो. 


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


कावड यात्रा मार्गावर भोजनालये, फूड स्टॉल्सवर आता मालकाच्या नावाच्या पाट्या, उत्तर प्रदेशच्या योगी सरकारचा निर्णय


Video : मुलांच्या अंगावर कोसळली शाळेची भिंत, मन हेलावून टाकणारा प्रसंग कॅमेऱ्यात कैद!


धक्कादायक! 3 वर्षांपासून बेपत्ता, पण मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत झळकला; वृ्द्धाच्या मुलाने घेतली पोलिसात धाव