त्यामुळे पवार आणि राऊत यांच्यातील या पुण्यात होणाऱ्या या प्रकट मुलाखतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राऊत कोणते प्रश्न विचारणार आणि त्याला शरद पवार हे कसे उत्तर देणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. तसेच या मुलाखतीतून अनेक गुपिते उलगडली जाण्याची शक्यता होती. मात्र आता मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने ही मुलाखत पुढे ढकलली असल्याची माहिती आहे. गेल्यावर्षी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही गेल्या शरद पवार यांची पुण्यातच जाहीर मुलाखत घेतली होती.
शरद पवार आणि संजय राऊत यांच्यातील सख्य सर्वपरिचीत आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याच्या प्रक्रियेत राऊतांनी अनेकदा पवारांची भेट घेतली होती. तसेच पवार समजून घ्यायला शंभर जन्म घ्यावे लागतील, असं देखील राऊत म्हणाले होते. मला शरद पवारांवर अजिबात शंका नाही. भाजपच्या मुंबईतील नेत्याने मध्यंतरी वक्तव्य केलं होतं की नरेंद्र मोदी यांना समजून घ्यायला संजय राऊतांना 25 जन्म लागतील. तसंच मी या देशातल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, माननीय शरद पवार यांना समजून घ्यायला 100 जन्म लागतील, असं राऊत म्हणाले होते.
या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊत आणि शरद पवारांमधील होणाऱ्या या कार्यक्रमाची पुणेकरांसह अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. मात्र आता अनिश्चित काळासाठी ही मुलाखत पुढे ढकलली आहे.
संबंधित बातम्या- Pune | पुण्यात पवार आणि संजय राऊत यांच्यात रंगणार 'सामना', 29 डिसेंबरला राऊत घेणार मुलाखत | ABP Majha