मुंबई : मुंबईतल्या वडाळ्यामध्ये शिवसैनिकांनी फेसबूक पोस्टवरून एका व्यक्तीला मारहाण केली होती. आता शिवसैनिकांविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आवाज उठवला आहे. पिडीत तरूणाच्या समर्थनात किरीट सोमय्या यांनी भूमिका घेत थेट वडाळा पोलीस स्टेशन गाठलं आहे. एवढचं नाहीतर हिरामणींना मारहाण करणाऱ्या व्यक्तीला अटक का केली गेली नाही?, असा सवालही सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
आज किरीट सोमय्या हिरामणी तिवारींच्या मदतीला वडळ्यात पोचल्यानंतर मोठ्या संख्येनं शिवसैनिक देखील या भागात दाखल झाले होते. त्यामुळे काही काळ या भागात तणाव वाढला होता. सध्या पोलिसांकडून या भागात अधिकची कुमक बोलवून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
काय आहे हे प्रकरण?
शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरें विरोधात फेसबूकरवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला शिवसैनिकांनी चोप दिला होता. एवढचं नाहीतर भर चौकात त्याचे केस कापून टक्कल करण्यात आलं होतं. मुंबईतील वडाळ्यात ही संतापजनक घटना घडली होती. दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर 15 डिसेंबर रोजी जामिया मिलिया इस्लामियातील विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती. या घटनेचा निषेध देशभरातील विविध ठिकाणांहून करण्यात येत होता. याबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाविरोधात वडाळात राहणाऱ्या हिरामणी तिवारी या व्यक्तीनं फेसबूक पोस्ट टाकली होती. मात्र त्याला विरोध करताना शिवसैनिकांनी मात्र कायदाच हातात घेतला होता.
मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले होते?
जामिया विद्यापीठातील हिंसाचार जालियनवाला बाग हिंसाचाराची आठवण करून देणारा आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले होते. देशातील तरूणांना बिथरवू नका, असा इशाराही त्यांनी केंद्र सरकारला दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील जामिया विद्यापीठातील हिंसाचारावर पहिल्यांदाच भाष्य केले होते.
संबंधित बातम्या :
उद्धव ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्याला शिवसैनिकांकडून चोप, मुंबईतल्या वडाळ्यातील संतापजनक घटना
उद्धव ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्तीचं किरीट सोमय्यांकडून समर्थन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Dec 2019 05:27 PM (IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाविरोधात वडाळात राहणाऱ्या हिरामणी तिवारी या व्यक्तीनं फेसबूक पोस्ट टाकली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -