Akshay's Guinness World Record : बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या त्याच्या 'सेल्फी' (Selfie Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. पण याच दरम्यान अक्षय कुमार संबंधित आणखी एक बातमी समोर आली आहे. ही बातमी ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. खरंतर, बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या अक्षय कुमारने नुकताच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे. 


अक्षय कुमारने केवळ तीन मिनिटांत तब्बल 184 सेल्फी काढून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे. अक्षयच्या या आगळ्या वेगळ्या रेकॉर्डने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. तर यामुळे अक्षयचे चाहतेही फार खुश झाले आहेत. अक्षयने या आनंदात एक व्हिडीओही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये अक्षयने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, "माझ्या चाहत्यांच्या मदतीने मी तीन मिनिटांत सर्वाधिक सेल्फी घेण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे. सर्वांचे आभार. हा क्षण खूप खास होता आणि तो माझ्या कायम लक्षात राहील."






'या' दिवशी सेल्फी चित्रपट होणार रिलीज  


अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी यांचा सेल्फी हा चित्रपट येत्या 24 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. 'गुड न्यूज' चित्रपटाचे दिग्दर्शक राज मेहता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. तर दिग्दर्शक, निर्माता करण जोहरनं चित्रपटाची निर्मिती केली आहे. सेल्फी या चित्रपटात अॅक्शन, ड्रामा आणि कॉमेडीचा तडका पाहायला मिळणार आहे. सेल्फी या चित्रपटात अक्षय आणि इमरान यांच्यासोबतच अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur), नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) या देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. सेल्फी या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी पहिल्यांदाच एका चित्रपटात दिसणार आहेत. 


सेल्फीबरोबरच अक्षयचे काही चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 'वेडात मराठे, वीर दौडले सात' या चित्रपटात देखील अक्षय कुमार काम करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करत आहे. तर, 2000 मध्ये प्रदर्शित झालेला 'हेरा फेरी' या चित्रपटाला प्रेक्षक आजही आवडीनं पाहतात. एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, 'हेरा फेरी 3' (Hera Pheri-3) च्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अक्षयच्या फॅन्ससाठी चित्रपटांची मेजवानीच असणार आहे असं म्हणायला हरकत नाही.


महत्त्वाच्या बातम्या : 


Avatar 2 Beats Titanic : जेम्स कॅमरॉनच्या 'अवतार 2'ने रचला इतिहास; बॉक्स ऑफिसवर 'टायटॅनिक'चाही तोडला रेकॉर्ड