Sachin Shroff Wedding : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता सचिन श्रॉफ (Sachin Shroff) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तो तारक मेहता या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सचिन श्रॉफ येत्या 25 फेब्रुवारीला दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे. 


सचिन श्रॉफ दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे. याआधी तो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जूही परमारसोबत (Juhi Parmar) लग्नबंधनात अडकला होता. 15 जानेवारी 2009 साली त्यांचं लग्न झालं होतं. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर लग्नाच्या नऊ वर्षांनंतर जानेवारी 2018 साली त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांना समायरा नावाची मुलगी आहे. 


सचिन श्रॉफची होणारी पत्नी कोण आहे? 


मीडिया रिपोर्टनुसार, सचिन श्रॉफ 25 जानेवारीला लग्नबंधनात (Sachin Shroff Wedding) अडकणार आहे. सचिनची होणारी पत्नी एक इव्हेंट मॅनेजर आहे. सचिनची होणारी पत्नी ही गेल्या काही वर्षांपासून त्याच्या बहिणीची मैत्रीण आहे. सचिनच्या होणाऱ्या पत्नीचे नाव काय आहे यासंदर्भात अद्याप आणखी माहिती समोर आलेली नाही. 






सचिन श्रॉफ एक लोकप्रिय अभिनेता आहे. अनेक मालिकांच्या माध्यमातून त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. 'आश्रम' या वेबसीरिजच्या माध्यमातून त्याने ओटीटी विश्वात पदार्पण केलं आहे. 2008 सालापासून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सध्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 


सचिन श्रॉफच्या पहिल्या पत्नीबद्दल जाणून घ्या... (Sachin Shroff First Wife)


सचिन श्रॉफची पहिली पत्नी जूही परमार (Juhi Parmar) आहे. एका मालिकेच्या शूटिंगदरम्यान त्यांची भेट झाली होती. या मालिकेदरम्यान त्यांची मैत्री झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जयपूरच्या एका महालात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला होता. पण पुढे दोघांमध्ये सतत मतभेद सुरू झाले आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 


संबंधित बातम्या


Taarak Mehta ka Ooltah Chashmah show :  अखेर प्रतीक्षा संपली! 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत नव्या 'तारक मेहता'ची एन्ट्री; प्रोमो पाहिलात?