पुणे : माणचा आमदार हा उर्मट आहे, तो घरे पेटवण्यासाठी काम करतो तर मी चुली पेटवण्यासाठी कामे करेन असं सांगत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी माण-खटाव विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. इथल्या आमदाराने पाण्याचं राजकारण केलं, आता परिवर्तन अटळ आहे असंही अनिल देसाई म्हणाले. अनिल देसाई यांनी शरद पवार यांची भेट घेतली असून मान खटावमधून तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली.
अनिल देसाई म्हणाले की, माण आणि खटाव मतदारसंघातील कार्यकर्ते घेऊन आलो आहे. शरद पवार साहेबांकडे मी उमेदवारीची मागणी केली आहे. या आधी 15 वर्षे मी थांबलो आहे. त्यामुळे यंदा मला उमेदवारी पाहिजे.
अनिल देसाई म्हणाले की, गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये 17 जण इच्छुक होते, आता तर चारच जण इच्छुक आहेत. प्रभाकर देशमुख हेदेखील मला साथ देतील. जयकुमार गोरे यांनी पाण्याचे राजकारण केलं आहे. पण पाणी शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे. आमचा आमदार घरे पेटवण्यासाठी काम करतो, मी चुली पेटवण्यासाठी कामे करेन. मान खटावमधून शरद पवार मला संधी देतील हा माझा विश्वास आहे.
अनिल देसाई यांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
- सातारा जिल्हा बँकेवर 22 वर्षे संचालक म्हणून काम.
- दोन वेळा सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष.
- 5 वर्षे पंचायत समिती सदस्य.
- 15 वर्षे जिल्हा परिषद सदस्य.
- 2014 सालच्या विधानसभेत अपक्ष उमेदवार - 19,700 मते
- लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीत प्रवेश.
- माण खटावमधून धैर्यशील मोहिते पाटलांना मोठे मताधिक्य.
कोविड उपचारात गैरव्यवहाराबद्दल जयकुमार गोरे यांच्याविरुद्ध गुन्हा
कोरोना काळात सातारा जिल्ह्यातील मायणी येथील वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना उपचार केंद्र सुरू करण्यात आलं होतं. या वेळी त्याठिकाणी हजारो लोकांवर उपचार करण्यात आले होते. वेळी 35 रुग्ण मृत असतानाही उपचार केल्याचे दाखवून शासनाचा निधी हडप केल्याची तक्रार करण्यात आली होती.
या प्रकरणी उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश देताना आमदार जयकुमार गोरे (jaykumar gore) यांच्यासह याचिकाकर्ते दीपक देशमुख हे संस्थेचे उपाध्यक्ष असल्याने त्यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांविरुद्धही गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशानुसार महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्यचे अधिकारी देविदास बागल यांनी वडूज (ता. खटाव) पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही बातमी वाचा :