सातारा :  लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले सातारा (Satara News) जिल्ह्यातील मांढरदेवी (Mandhardevi Mandir) गडावरील काळुबाईचे मंदिर आठ दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. गाभाऱ्यातील दुरुस्तीच्या कामासाठी मंदिराचा संपूर्ण गाभारा बंद ठेवला जाणार असल्याचे मंदिर समितीने कळवले आहे. 21  ते 28 सप्टेंबर या कालावधीत हे मंदिर बंद ठेवले जाणार आहे. या कालावधीत भाविकांना मात्र बाहेरुनच दर्शन घ्यावे लागणार आहे. त्यामुळे गडावर येणाऱ्या भाविकांना ज्यांना बाहेरुन दर्शन घ्यायचे आहे ते मात्र या गडावर येऊ शकतात. मात्र गाभाऱ्यात जाऊन देवीचे मुख दर्शन घेता येणार नाही, असे समितीकडून कळवण्यात आले आहे.


मांढरदेवी  गडाच्या गाभाऱ्याचे दुरुस्तीचे काम हाती घेतले असले तरी भाविकांना गडावर येऊन आपले कुलधर्म कुलाचार करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. या कालावधीत भाविकांना बाहेरुनच दर्शन घ्यावे लागणार आहे.मात्र  कोणालाही गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी जाता येणार नाही, असे देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने स्पष्ट केले आहे. 


2005 मध्ये गडावर मोठी चेंगराचेंगरी


मांढरदेव गडावरील काळूबाई नवसाला पावणारी देवी अशी आख्यायिका आहे  राज्यभरातील लाखो भाविक या ठिकाणी देव दर्शनासाठी येत असतात.शाकंबरी  पौर्णिमेला मांढारदेवी गडावर सुमारे 7 ते 8 लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात.  गडावरच्या भाविकांच्या गर्दीमुळे पूर्वी या ठिकाणी नारळ, तेल, लिंबू यांचा मोठा सडा येथे पाहायला मिळायचा. या ओलाव्यातून घसरडे झालेल्या पायऱ्यांवरुन काही भाविक घसरले जात होते. याच कारणातून 2005 मध्ये गडावर मोठी चेंगरा-चेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 295 भाविकांचा चिरडून मृत्यू झाला होता.


आपलं गाऱ्हाणं देवीसमोर मांडण्यासाठी आणि इच्छा पूर्ण झाली म्हणून दर्शनासाठी लाखो भाविक खासकरून यात्रेला हजेरी लावतात' अशी मान्यता आहे.  देवीचे मंदिर कधी व कोणी बांधले याची फारशी नोंद आढळून येत नाही. पण मंदिराच्या हेमाडपंथी शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर बरेच प्राचीन असल्याचे काही पुरावे आढळले आहेत. सह्याद्री पर्वतरांगेतील एका उंच समुद्र सपाटीपासून 4650 फूट टेकडी वर हे मंदिर आहे. ते साताऱ्यातून 20 कि.मी. अंतरावर मांढरदेवी काळुबाईचे मंदिर आहे . मंदिर लहान असून त्यास सभामंडप व गाभारा आहे. गाभाऱ्यामध्ये चांदीचे सुरेख काम करण्यात आहे आहे. कळस रेखीव असून त्यावर गाय, सिंह यांच्या मूर्ती बसविलेल्या आहेत


हे ही वाचा :