Satara Crime: सातारा जिल्ह्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील संनबुरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळल्याने खळबळ उडाली आहे. आई-वडील आणि दोन मुलांसह घरात मृतदेह आढळून आले. घरातून कोणी बाहेर येत नसल्यामुळे ग्रामस्थांना शंका आली. यानंतर पाहणी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मात्र, आत्महत्या की घातपात याबाबत मात्र स्पष्टता आलेली नाही. आनंदा जाधव (वय 65 वर्षे) त्यांची पत्नी सुनंदा जाधव (वय 60 वर्षे), मुलगा संतोष आनंद जाधव (वय 35 वर्षे) मुलगी पुष्पलता दस (वय 45 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
Satara Crime: साताराच्या पाटण तालुक्यात एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह सापडले; आत्महत्या की घातपात? याबाबत संभ्रम
राहुल तपासे, एबीपी माझा | परशराम पाटील | 21 Jul 2023 01:57 PM (IST)
Satara Crime: आई-वडील आणि दोन मुलांसह घरात मृतदेह आढळून आले. घरातून कोणी बाहेर येत नसल्यामुळे ग्रामस्थांना शंका आली. यानंतर पाहणी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
Satara Crime