सातारा : कालपर्यंत एकमेकांचे शत्रू असलेले साताऱ्यातील (Satara News) भाजप नेते खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanaraje Bhosale) आणि साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (MLA Shivendraraje Bhosale) यांच्यातील संघर्ष अवघ्या एका रात्रीत नेमका संपला कसा? असा प्रश्न सध्या सातारकर विचारत आहेत त्याचे कारणही तसेच आहे. साताऱ्यात शिवतीर्थावर 'मेरी माटी मेरा देश' अभियानाला सुरुवात आज साताऱ्यातून (Satara) झाली. या मोहिमेच्या अंतर्गत त्याचे उद्घाटन साताऱ्यातील पोवईनाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन सुरुवात झाली. या शुभारंभाला दोन्ही राजे एकमेकांना खेटून उभे राहिले होते. एवढंच काय उदयनराजे भोसले जेव्हा कार्यक्रमस्थळी आले तेव्हा चक्क उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना वाकून मुजराही केला. 


अवघ्या बारा तासामध्ये भाजप वरिष्ठ नेत्यांनी अशी नेमकी काय जादूची कांडी फिरवली हे मात्र गुलदस्त्यात असले तरी सातारकरांना हायसे वाटले. असा चमत्कार या अगोदर इतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांना जमला नाही तो आज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या जादूच्या कांडीने दाखवला यात शंका नाही. मात्र, ही जादूची कांडी नेमकी कोणी आणि कोणत्या आश्वासनावर फिरवली याबाबत मात्र नक्कीच चर्चा होणार आहे. 


दोन महिन्यांपूर्वी साताऱ्यात राडा


दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी शिवराज ढाब्याजवळ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन जागेच्या भूमिपूजन कार्यक्रमामुळे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले आमनेसामने आले होते. खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम उधळून लावला होता. मात्र, तरी देखील उदयनराजेंचा विरोध झुगारुन शिवेंद्रराजे भोसले यांनी भूमिपूजन केलं होतं. या प्रकारानंतर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. 


शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते या जागेचं भूमिपूजन होणार असतानाच उदयनराजे आपल्या कार्यकर्त्यांसह पोहोचले होते आणि तिथे असलेलं साहित्य फेकून दिलं होतं. तसंच, एक कंटेनरही जेसीबीने नष्ट केला होता. त्यानंतर शिवेंद्रराजेंनी कार्यकर्त्यांसह येत उदयनराजेंचा विरोध झुगारुन त्यांच्यासमोर भूमिपूजन केलं. यानंतर उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजेंसह 50 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. गर्दी जमवणे, दमदाटी आणि मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या