सातारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)   यांनी इस्लामपूर येथील सभेत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते  छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  यांच्यावर गंभीर आरोप केलेत. छगन भुजबळ यांनी केलेली वक्तव्ये पाहता त्याना राज्यात दंगली घडवून आणायच्या आहेत असा आरोप केला. छगन भुजबळ यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत. मराठा-ओबीसीनी एकमेकांच्या अंगावर जाऊ नये, ही राजकीय मंडळी आपल्यात झुंज लाऊ शकतात. त्यामुळे सावध राहा असे आवाहनही जरांगे पाटील यांनी यावेळी केले आहे. 


मनोज जरांगे म्हणाले,  भुजबळ यांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून जातीय दंगली करण्याचा प्रयत्न सुरू आहे.  यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावरून अपेक्षा करतो की आत्ताचे मुख्यमंत्री लवकरात लवकर आरक्षण देतील टाईम बॉण्ड ही देतील. शिवाय मंत्री छगन भुजबळ यांना समजूनही सांगतील. उशिरा का होईना पाप बाहेर आले आहे.  दंगली घडवण्यासाठी वक्तव्य सुरु  आहेत.  वैचारिक विचार मांडले पाहिजे. तो माणून ओबीसीसह मराठा समाजाच्या मनातून उतरला  आहे. 


छगन भुजबळ माणूस राज्याच्या शांततेसाठी चांगला नाही : मनोज जरांगे 


यशवंतराव चव्हाणांचा आमच्यावर प्रभाव आहे .मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण आम्ही मागितलं  तर ते म्हणतात आमची मुलं गुरु ढोरं आहेत का? ओबीसी लेकांरांचा भुजबळांनी अपमान केला आहे.  हा माणूस राज्याच्या शांततेसाठी चांगला नाही. आम्ही राज्यात शांतता राखू .आपल्यात झुंज लावून राजकिय फायदा घेतील. त्यामुळे दोन्ही समाजांनी सावध राहा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. 


काय म्हणाले  छगन भुजबळ?


 छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर तुफान हल्ला केला. "कोणाचं खाता कोणाचं खाता? असं म्हणतो, पण तुझे खातो काय रे ?" असं म्हणते  भुजबळांनी जरांगेंवर हल्ला चढवला. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही. आरक्षण काय ते समजून घे आणि आम्हाला म्हणतो आरक्षण द्या आरक्षण द्या, असं म्हणत भुजबळांनी जरांगेंवर निशाणा साधला. मराठा तरुणांना मला सांगायचे आहे, या दगडाला शेंदूर लावून कोणता देव करायच आहे? त्याला आरक्षण कळेना, आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, असं भुजबळ म्हणाले.  


हे ही वाचा :


Chhagan Bhujbal : तो पाचवी तरी पास आहे का? माझ्या शेपटीवर पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस; छगन भुजबळांचे मनोज जरांगेंना थेट इशारा