सातारा : सातारा (Satara) लोकसभा मतदारसंघावर अजित पवारांनी (Ajit Pawar) दावा केल्या नंतर आता साता-यातील मतदासंघ कोणाच्या वाट्याला जाणार यावरुन चांगलच रणकंदन सुरु झाल्याचं चित्र आहे. त्यातच आता भाजपचे आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी सातारा लोकसभा मतदारसंघ हा भाजपचाच असून आम्हीच याठिकाणी निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय. सध्या राज्यात लोकसभा निवडणुकांची तयारी सुरु झालीये. त्यातच महायुतीच्या सरकारमध्ये पुन्हा एकदा जागावाटपावरुन नाराजीनाट्य होणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघावरुन महायुतीच्या सरकारमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. सध्या सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उदयनराजे भोसले हे खासदार आहेत. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून श्रीनिवास पाटील नेतृत्व करत आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांनी देखील या मतदारसंघावर दावा ठोकला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा जागावाटपाच्या प्रश्नावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.
जयकुमार गोरेंनी काय म्हटलं?
सातारा लोकसभा मतदारसंघावर अजित पवारांनी दावा केल्या नंतर आता साता-यातील मतदासंघ कोणाच्या वाट्याला जाणार यावरुन चांगलच रणकंदन सुरु झालंय.भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी म्हटलं की, सातारा लोकसभा मतदारसंघ हा भाजपचाच असून आम्हीच याठिकाणी निवडणूक लढवणार आहोत. मागील चार वर्षांत साताऱ्यात भाजपने मोठ्या ताकदीने काम केलं आहे. त्याचप्रमाणे भाजप हा सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे कोणी काहीही भूमिका मांडली तरीही कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ भाजपकडेचं राहिलं पाहिजं असं मत पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे हा मतदारसंघ आम्ही कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असं म्हणत जयकुमार गोरे यांनी थेट अजित पवारांनाच आव्हान दिल्याचं पाहायला मिळालं.
अजित पवारांनी काय म्हटलं होतं?
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आगामी लोकसभा निवडणुकीत आपला पक्ष बारामती , शिरूर , सातारा आणि रायगड मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवेल असं म्हटलं. पक्षाच्या कर्जतमध्ये सुरु असलेल्या दोन दिवसीय शिबिरात बोलताना अजित पवारांनी ही घोषणा केली होती. त्यानंतर या चारपैकी तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये अजित पवार गटाची लढत शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या विरुद्ध होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार जिथून निवडणून आलेत त्या बारामती , सातारा , शिरूर आणि रायगड या लोकसभेच्या चार जागा आपला पक्ष लढवेल असं अजित पवारांनी जाहीर केलं.
हेही वाचा :
अजित पवारांनी जाहीर केलेल्या 4 जागांवर 2014 आणि 2019 मध्ये काय झालं होतं?