सातारा : साताऱ्यात सिने स्टाईलने भर रस्त्यात तरुणाला पाडून लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार वाहतूक पोलिसासमोर घडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिवतीर्थानजीक हा धक्कादायक प्रकार घडला. एका तरुणाला भर रस्त्यात वाहतूक पोलिसांसमोरच काही तरुणांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. सातारा शहरातील गजबजलेला भाग असणाऱ्या पोवई नाक्यावर हा सगळा मारहाणीचा प्रकार सुरू होता. सात जणांनी एकत्र येत अक्षय मांढरे या तरुणाला रस्त्यावर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्या भागात उपस्थित असलेल्या वाहतूक पोलिसांसमोर हा सगळा प्रकार सुरू होता.


पोलिस या तरुणांना अडवण्याचा प्रयत्न करत होते, तरीदेखील हे तरुण संबंधित तरुणाला मारतच होते. या घटनेनंतर तरुण फरार झाले. दोघांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले असून पाच संशयित आरोपी फरार झाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या