Koyna Dam : राज्यात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यातील धरणामधील (Dam) पाणी साठ्यामध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट (Koyna Dam) क्षेत्रात देखील पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या 24 तासांत झालेल्या पावसाने कोयना धरणात (Koyna Dam) जलाशयाच्या एकूण पाणीसाठ्यात साडेतीन टीएमसी पाणीसाठी वाढला आहे. पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे.
कोयना धरणातील (Koyna Dam) एकूण पाणीसाठा 48.65 टीएमसी इतका झाला असून, कोयना धरण लवकरच 50 टक्के भरण्याची शक्यता आहे. कोयना धरण परिसरातील गेल्या 24 तासांच्या पावसाने कोयणा धरणात (Koyna Dam) झपाट्याने वाढ झाली आहे. 24 तासांमध्ये धरणातील पाणासाठी 4 टीएमसीने वाढला आहे. प्रती सेकंदाला धरणात 42 हजार क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. कोयना धरण परिसरात गेल्या 24 तासात 127 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. तर महाबळेश्वर परिसरात 158 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे.
कोयना धरण परिसरामध्ये बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला होता. त्यानंतर गुरुवारी दिवसभर मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत होता. दोन दिवस झालेल्या जोरदार पावसाने कोयना धरणातील पाणीसाठ्यामध्ये वेगाने वाढ झाली आहे. जलाशयात प्रतिसेकंद ४० हजार ४६२ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. कोयना धरणाचा एकूण पाणीसाठा 48.65 टीएमसी झाला असून, धरणाचा पाणीसाठा जवळपास 50 टक्क्यांपर्यंत येऊन पोहचला आहे.
साताऱ्यात सध्या तुरळक सरी
सातारा जिल्ह्याच्या गेल्या तीन ते चार दिवसात मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे कृष्णा, कोयनासह सर्व नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तसेच महाबळेश्वर तालुक्यातील ओढे आणि नाले वाहू लागले आहे. सध्या सातारा जिल्ह्यात तुरळक सरी कोसळत आहेत.
राज्यातील या भागात मुसळधार पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार (IMD), आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा (Heavy Rain) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील यवतमाळ, नागपूर, वर्धा, अमरावती आण अकोला या चार जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज मुंबईसह ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, नाशिक, धुळे, जळगाव तसेच मराठवाज्यातील काही जिल्ह्यांसह विदर्भात देखील पावसाचा (Heavy Rain) यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीमवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.