सातारा : उत्तेश्वर देवाच्या यात्रेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सातारा जिल्ह्यातील (Satara) त्यांच्या दरे गावी आले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या शेतात स्वतः काम करत रोटर फिरवला. तसेच  हळदीच्या शेतात हळद काढण्याचे काम केले. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांला उत्तर देताना राज्य सरकारला टिकणारे मराठा आरक्षण द्यायचे आहे, त्यामुळे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि मराठा आंदोलकांनी आंदोलन टाळलं पाहिजे, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. 


बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले?


दरम्यान, यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी टीका केली. ते म्हणाले की, लांडग्यांनी वाघाचं कातडं घातलं तरी ते वाघ होत नाहीत वाघ एकच फक्त बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले? बाळासाहेबांनी काँग्रेसला दूर ठेवलं. भविष्यात माजी शिवसेना काँग्रेस होईल, त्यावेळी मी माझं दुकान बंद करीन असं त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मिंधे कोण हे सर्व जनता जाणते, स्वार्थासाठी बाळासाहेबांचे विचार सोडले. महाराष्ट्रात या भाजप आणि शिवसेना या युतीला निवडून दिले त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. मग गद्दारी कोणी केली? अशी विचारणा त्यांनी केली. बाळासाहेबांचे कपडे बाळासाहेबांचे रुद्राक्ष घालून बाळासाहेब होता येत नाही. 


उध्दव ठाकरेंना मोंदींवर बोलण्याचा काय अधिकार?


ते म्हणाले की, मोदीनी जे बाळासाहेबांचे स्वप्न 370 कलम,राम मंदीर बनवण्याचे स्वप्न पूर्ण केले त्यांचे आभार मानले पाहिजे होते. त्यांना साष्टांग दंडवत घालायला पाहिजे होता, पण हे काँग्रेसच्या खाली दंडवत घालत आहेत. बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडले आहेत, म्हणून त्यांना नैतिक अधिकार नाही. ये पब्लिक है सब जानती है येणाऱ्या निवडणुकीत बेईमानी, मिंधेपणाचं उत्तर जनता देईल. 


अशा लोकांना जनता परत सत्ता कशी देणार?


सत्तेत आल्यावर ज्यांनी खिचडी घोटाळा, कफन घोटाळा केला त्यांना आपण खिचडी,कफण चोर म्हणायच का? अशा लोकांना जनता परत सत्ता कशी देणार? घरी बसलेल्या लोकांना कुणी सत्ता देतं का?  आम्ही 24x7 काम करतो. मोंदींबद्दल पोटदुखी आहे. मोदी आले की यांची पोट दुखी सुरु होते, केंद्र आणि राज्य सरकार बुलेट ट्रेनच्या वेगाने काम करत असल्याचे ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या