Udayanraje Bhosale : छत्रपती शिवरायांनी लोकशाहीचा ढाचा रचला, छत्रपती शिवरायांनी त्यावेळीच विचार मांडला आणि सर्वधर्म समभाव संकल्पना त्यांनी दिली. त्यामुळे हा नको, तो नको चालणार नाही असे खडे बोल खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सुनावत सीएम एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसमोर कान टोन टोचले.
लंडनहून आणलेली वाघनखे पाहण्यासाठी खुली
सातारमधील छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये लंडनहून आणलेली वाघनखे पाहण्यासाठी खुली करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. मोठ्या उत्साहात शासकीय निवासस्थान ते छत्रपती शिवाजी संग्रहालय अशी वाद्यांच्या गजरात आणि मर्दानी खेळांच्या उत्साहात रॅली काढण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वाद-विवाद का तयार केला जात आहे
दरम्यान, उदयनराजे भोसले बोलताना म्हणाले की, राज्य सरकारच्या वतीने महाराजांचे एक अधिकृत चारित्र्य प्रकाशित करण्यात यावे. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वाद-विवाद का तयार केला जात आहे अशी विचारणा केली. त्यांच्या बाबतीत असे का केले जाते हे आपण टाळले पाहिजे, असेही उदयनराजे यांनी नमूद केले. वादविवाद करत असाल, तर त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की असे करू नका. शिवाजी महाराजांच्या वस्तूंबाबत असे वाद तयार करू नका, जशी अनेक वाघनखे असतात तशीच ही असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या