Kolhapur Weather Update : कोल्हापूर, सातारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट; अलमट्टी धरण 80 टक्के भरले
जयदीप मेढे
Updated at:
19 Jul 2024 02:49 PM (IST)
1
कोल्हापूर जिल्ह्याला आज (19 जुलै) पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
उद्यापासून पुढील तीन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे.
3
सातारा जिल्ह्याला आज (19 जुलै) पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
4
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड बोळावी मार्गावरील ठाणेवाडीत दरड कोसळून मोठा दगड रस्त्यावर आला.
5
आजरा ते चंदगड रस्त्यावर कासारकांडगाव -जेऊर या गावामध्ये रस्त्याला लागून असलेल्या डोंगरावरून काही दगड घसरून खाली आले होते.
6
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील 65 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
7
जिल्ह्यातील राधानगरी धरणात 58 टक्के पाणीसाठा झाला आहे.
8
अलमट्टी धरणामध्ये 80 टक्के पाणीसाठा झाला आहे.
9
कोयना धरणामध्ये 45 टक्के पाणीसाठा झाला आहे.
10
कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणीपातळी 29.7 फुटांवर गेली आहे.