Sharad Pawar on Satara Loksabha : सातारा लोकसभेच्या रिंगणातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतली आहे. तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. सातारा दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी लोकसभेसाठी पुढील दोन ते तीन दिवसात सातारचा उमेदवार जाहीर केला जाईल, अशी घोषणा शरद पवार यांनी केली.
शरद पवार गटाचा उमेदवार कोण असणार?
श्रीनिवास पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार कोण असणार? याबाबत विचारण्यात आले असता शरद पवार यांनी चार नावे घेत सस्पेन्स कायम ठेवला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी सातारच्या लोकसभेसाठी तीन तीन चार नावे चर्चेत असल्यास सांगितले. यामध्ये शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनील माने तसेच सत्यजित पाटील यांची नावे चर्चेत असल्याचे ते म्हणाले. आम्ही यावरती चर्चा करून उमेदवार घोषित करू अशी माहिती यावेळी शरद पवार यांनी दिली.
दरम्यान, शरद पवार यांनी सातारामधून मला स्वतःला सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी आग्रह होत असल्याचे यावेळी सांगितले. त्यामुळे सातारच्या उमेदवारीचा निर्णय आज होईल असं बोलला जात होतं. मात्र, आता पुन्हा एकदा हात दोन-तीन दिवसांनी हा निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, माढा लोकसभेच्या अनुषंगाने विचारण्यात आला असता शरद पवार यांनी ती जागा धनगर समाजासाठी द्यावी यासाठी मी स्वतःहून याबाबत घोषणा केली होती असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, साताऱ्याचा जो उमेदवार असेल तो महाविकास आघाडीचा उमेदवार असेल असेही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
महायुतीमधून कोण उमेदवार असणार?
सातारमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित होत नसतानच महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी उमेदवारीसाठी दिल्लीमध्ये तळ ठोकळा होता. यानंतर झालेल्या चर्चा आणि टीकाटिप्पणीनंतर उदयनराजे यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यामुळे ते भाजपच्या चिन्हावरती सातारमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. मात्र, या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडूनही दावा करण्यात आल्याने याठिकाणी कोणता निर्णय होणार याकडे सुद्धा लक्ष आहे.
अजित पवार गटाकडून उदयनराजे यांना घड्याळ चिन्हावर प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र, उदयनराजे यांनी भाजपच्या चिन्हावरच लढण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे सातारच्या लढतीचे चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या