Santosh Deshmukh Murder Case Update Sudharshan Ghule बीड: बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले (Sudharshan Ghule) याच्यासह सुधीर सांगळेला (Sudhir Sangle) शुक्रवारी (3 जानेवारी) पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. याआधी जयराम चाटे, महेश केदार, प्रतिक घुले आणि विष्णू चाटे या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे आता संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. तर कृष्णा आंधरे हा आरोपी अजूनही फरार आहे.
सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुलेला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी अटक केलेला या प्रकरणातील आरोपी प्रतिक घुलेची (Pratik Ghule) एक जुनी पोस्ट व्हायरल होत आहे. महत्वाचं म्हणजे ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. त्यादिवशीच प्रतिक घुलेने पोस्ट केली आहे. नाव खराब केल्याने नाव संपत नस्तय भुरट्या…बाप हा बापचं असतो #सुदर्शन भैय्या घुले #3333 #विरोधकांचा बाप अशी पोस्ट प्रतिक घुलेने केलीय. तसेच 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुखांचे अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या काळ्या स्कॉर्पिओचा क्रमांक 333 आहे. हा निव्वळ योगायोग म्हणावा की या 3333 क्रमांकामागे नेमकं काय लपलंय हे लवकरच चौकशीतून स्पष्ट होणार आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले कोण?
सुदर्शन घुले बीडमधील केजचा टाकळी गावचा रहिवाशी आहे. सुदर्शन घुले 27 वर्षांचा आहे. सुदर्शनचं इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण झाले आहे. सध्या सुदर्शन हा ऊसतोड मुकादम म्हणून काम करायचा. तसेच उचल घेऊन कामाला न आलेल्या मजूरांकडून सुदर्शन वसुली देखील करायचा. सुदर्शनची राजकारणात देखील चांगली ओळख असल्याचं सांगण्यात येत आहे. सुदर्शनवर 10 वर्षांत 10 गुन्हे दाखल आहेत. तर कृष्णा आंधळेवर 4 वर्षांमध्ये 6 गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. याचदरम्यान वाल्मिक कराड याचा खास असलेल्या विष्णू चाटे याच्यासोबत त्याची ओळख झाली. त्यातून त्याला काही कामं मिळाली. राजकीय नेते, पक्षाचे काम करणे, व्यवहार सांभाळणे अशा कामात तो तरबेज असल्याचे गावकरी सांगतात.
बीड सरपंच प्रकरणात 3 जणांना अटक; A to Z Updates, VIDEO:
संबंधित बातमी:
वाल्मिक कराड सरेंडर, पण सुदर्शन घुले त्यापेक्षा डेंजर; सरपंच हत्येतील मुख्य आरोपी घुले कोण?
वायभसेने पत्ते उघडले अन् अन् घुले, सांगळेचा ठावठिकाणा समजला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी कारवाई