Manoj Jarange On Dhananjay Munde Walmik Karad: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murdr Case) प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. आज (3 फेब्रुवारी) माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंसोबतच्या भेटीवर भाष्य केलं. निवडणुकीआधी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड भेटायला आले होते, असं मनोज जरांगे यांनी सांगितले. 


मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?


धनंजय मुंडे निवडणूकपूर्वी मला भेटायला आले होते. 8 दिवसांपासून फोन येत होते. रात्री 2 वाजता आले, सोबत कराड होता. आणि मला सांभाळा असे म्हटलं. मी झोपलो होतो ते आत आले. त्यांनी कराडची ओळख करून दिली. त्यावेळी मी त्यांना हर्व्हेस्टरचे पैसे बुडवणार असं त्यांना म्हटलं होतं. त्यांनी लक्ष राहुद्या असं म्हटलं. जाताना पाया पडले, असा गौप्यस्फोट मनोज जरांगे यांनी केला. दरम्यान, आरोपींना यंत्रणा सोडणार नाही, टोळी धनंजय मुंडे यांची आहे, आरोपींना लपवत आहे. याच्या एका नेत्याने जिवंतपणी मरण-यातना भोगल्या या टोळीमुळे, असा दावाही मनोज जरांगे यांनी यावेळी केला. 


महंत नामदेवशास्त्रींवर मनोज जरांगे काय म्हणाले?


महंत नामदेवशास्त्री यांचं सर्व उघड होत आहे, जे बोलायचं आहे ते बोलून गेले, टोळीने दाखवलं किती जातीवाद असतो. असे जातीवादी शब्द महाराष्ट्राने पहिल्यांदाच ऐकले आहेत. आरोपींचे समर्थन करणारे शब्द महाराष्ट्रचं नुकसान करणारे आहे, पोटातील ओठावर आले. बाबाला दोष देत नाही, करून घेणारी टोळी आहे. स्वतः साठी देवधर्म कळेना.... काही लोकांनी ओबीसीच्या नावाखाली अन्याय सहन केला. ओबीसी असून देखील त्यांच्यावर अन्याय झाला... आता लोक व्यक्त होत आहे, असं मनोज जरांगे म्हणाले. 


...अन्यथा आम्हाला भयंकर आंदोलन करावे लागणार- मनोज जरांगे


मराठा बांधवांना विनंती आहे, आरक्षण 100 टक्के मिळणार आहे. जिव्हारी लागेल असे काम करू नका, काल बीड ,जालना, सिल्लोड येथे आत्महत्या करण्यात आले. आत्महत्या करू नका, पण आणखी शिकू...थोडा विचार करा, तुमची मराठा विद्यार्थी भावना योग्य आहे. तुम्ही गरजेचे आहेत. तुम्हाला नेमकी किती बळी पाहिजे.मराठा लेकरं देखील तुमचं लेकरं समजा मुख्यमंत्री...अन्यथा आम्हाला भयंकर आंदोलन करावे लागणार आहे.... मुख्यमंत्री तुम्ही आरक्षण देत नाही, ही कोणती मरगुरी आहे,,, फडणवीस साहेब तुम्ही भावनावनश होऊ नका.... अन्यथा आम्हाला वेगळा आंदोलन करून तुम्हाला जेरीस आणावे लागेल.  मुख्यमंत्री तातडीने आरक्षण द्या अन्यथा आमचा संयम सुटणार आहे. तुम्ही मजा पाहणार असेल तर तुम्हला याचे फळ भोगावे लागेल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. 


मनोज जरांगे काय काय म्हणाले?, VIDEO:



संबंधित बातमी:


Walmik Karad: काळ्या काचा, आलिशान गाड्या; वाल्मिक कराड मध्यरात्री 1.36 वाजता टोलनाक्यावर, थर्टीफस्टआधी काय घडलं?, PHOTO