Dhananjay Deshmukh बीड : ज्या बंगल्यात हे सर्व मुख्य आरोपी बसले होते, त्या आरोपींचे नंबर उपलब्ध केलेत आणि सीडीआरची मागणी केली. त्यातील काही सीडीआर प्राप्त झाले. मला जर न्याय मिळत नसेल तर मी कोणत्याही परीक्षा द्यायला तयार आहे आणि तसे पाऊल उचलण्याच्या मी तयारीत आहे. असा इशारा सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी दिला आहे. सीडीआर प्रमाणे हे कसे आरोपी होतात. राजकीय पक्षाच्या कार्यालयातून ही गुन्हेगारी कशी केली गेली, हे सीडीआरमार्फत स्पष्ट होणार आहे. संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांची हत्या झाली त्यावेळी आरोपीने नेमका कोणाला फोन केला? हे सीडीआर मधून समोर येईल. असा दावा हि धनंजय देशमुख यांनी केला आहे.
जेल प्रशासनाला आम्ही सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली होती. मात्र ते अद्याप मिळालेले नाही. पालकमंत्री अजित दादा पवार यांना देखील त्याबाबतचे निवेदन दिले आहे. मात्र त्यावर काय कारवाई होते याकडे आमचे लक्ष आहे. तपासामध्ये हत्या झाल्यानंतर कुणी कुणाला कॉल केले? हे स्पष्ट झाले आहे. या घटनेचा संपूर्ण परदाफाश होणार आहे. असेही धनंजय देशमुख म्हणाले.
वाल्मिक कराड जेलमधून आजही अॅक्टिव्ह- अंबादास दानवे
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि त्याच्या टोळीतील सदस्य कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे आरोप विरोधकांकडून करण्यात आल्याने या जेलची राज्यभरात चर्चा रंगली होती. अशातच आता विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा केलाय. आताही वाल्मिक कराड जेलमधून सर्व काही करीत आहे. माझ्या समोर बसलेल्या एका व्यक्तीला जेलमधून वाल्मिक कराडचा फोन आला होता, असा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे. मी हे तीन महिन्यापूर्वी सांगितले होते. याप्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. याच मुद्दयांवर बोट ठेवत धनंजय देशमुख यांनी मागणी करत या प्रकरणी भाष्य केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या