Weekly Horoscope 28 July To 3 August 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जुलै महिन्याचा नवीन आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा अनेक अर्थांनी खास असणार आहे. कारण या आठवड्यात मोठ मोठ्या ग्रहांच्या हालचाली देखील होणार आहेत. जुलै महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? कुंभ आणि मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
कुंभ रास साप्ताहिक राशीभविष्य (Aquarius Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - कुंभ राशीच्या लोकांनी कौटुंबिक जीवनात शांतता राखा आणि अनावश्यक वाद टाळा.
करिअर (Career) - नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन आव्हाने येऊ शकतात, परंतु संयम ठेवा. व्यवसायात नवीन धोरण स्वीकारण्याची हीच योग्य वेळ आहे.
आर्थिक स्थिती (Wealth) - हा आठवडा तुमच्यासाठी आर्थिक बाबतीत काही संघर्ष आणेल, परंतु तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर परिस्थिती अनुकूल कराल.
आरोग्य (Health) - शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. योग आणि ध्यान केल्याने आराम मिळेल.
मीन रास साप्ताहिक राशीभविष्य (Pisces Weekly Horoscope)
कौटुंबिक जीवन (Family) - नातेसंबंधात प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता ठेवा. कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल.
करिअर (Career) - हा आठवडा नोकरीत स्थिरता राहील आणि प्रगतीच्या संधी मिळू शकतात. तुम्हाला व्यवसायात मोठी ऑर्डर मिळू शकते.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास, हा आठवडा तुमच्यासाठी नवीन शक्यता आणि प्रगती दर्शवणारा आहे. जुन्या कामात यश मिळू शकते
आरोग्य (Health) - या आठवड्यात पोटाशी संबंधित समस्या असू शकतात, त्यामुळे आहाराची काळजी घ्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: