सांगली : जातीयवादीशी आमचा काहीही संबंध नाही नाही, पण ओबीसीना आरक्षण देणं हे आमचं काम आहे आणि ते मिळवून देणार. सगेसोयरेला आमचा विरोध आहे हे सर्व आमदाराकडून लिहून घ्या. आरक्षणाबाबतची भूमिका सर्व पक्षाच्या प्रमुखांनी लिहून दिले पाहिजे, अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. प्रत्येक पक्षाने विधान सभेत 27 टक्के ओबीसी समाजाला आरक्षण पाहिजे. आरक्षणामुळे समाजात फूट पडली आहे. मराठा आणि ओबीसी मधील पोरं आता बोलत नाहीत. हे महाराष्ट्रासाठी चांगलं नाही, असे पडळकर म्हणाले. 


विशाल पाटील यांना लांब मिशा आल्या


सांगलीती ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा झाला. खासदार विशाल पाटील इथे मेळावा घेऊ नका असे म्हणत होते, दोन चार महिन्यातच विशाल पाटील यांना लांब मिशा आल्या, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. या मेळाव्यात आमदार गोपीचंद पडळकर यांनी सगेसोयरेला विरोध केला. गोपीचंद पडळकर म्हणाले की, प्रस्थपितांच्या बालेकिल्यात आज ओबीसी महा एल्गार मेळावा पार पाडत आहे. आमचा विरोध आहे म्हणून एकत्र आलो नाही. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले आहेत, त्याला ओबीसी नेत्यांचा विरोध नाही. आमचा विरोध सगे-सोयरे अधिसूचनेला आहे. 


सगे-सोयरे दाखले मिळू शकत नाही


त्यांनी सांगितले की, सगेसोयरे दाखले मिळू शकत नाही, पण मराठा समाजाचे फसवणूक काम करण्याचे काम सुरू आहे. ओबीसीमध्ये घुसखोरी सुरू आहे, त्याच्या विरोधात हा लढा सुरू आहे. आरक्षण देण्याची एक पद्धत आहे. महाराष्ट्रात पितृसत्ताक पद्धतीने आरक्षण मिळतं. म्हणून आमचं सगेसोयरेला आमचा विरोध आहे. सगेसोयरे आरक्षण मिळणार नाही हे मराठा समाजाला देखील माहीत आहे. 


सगेसोयरे आरक्षण एससीला देखील बाधक


गोपीचंद पडळकर म्हणाले की, आईकडून येणाऱ्या नातेवाईकांना धरून आरक्षण देता येत नाही. सगेसोयरे हे आरक्षण एससीला देखील बाधक आहे. छगन भुजबळ यांच्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाज एकत्र आला आहे. महाराष्ट्राच्या पोटात जातीयवादाचा कालवा सुरू आहे आणि आता शांतता यात्रा सुरू आहे. महाराष्ट्रसाठी ही बाब चांगली नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आपला दुसरा बाप असून आंबेडकर यांनी हे आरक्षण दिलं आहे त्यानुसार आपण चाललं पाहिजे. 


इतर महत्वाच्या बातम्या