Vishwajeet Kadam : शिवसेना नेते संजय राऊत यांना झालेल्या अटकेवर बोलताना काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी देशात हुकूमशाही विरोधात देशाचा इतिहास कसा आहे याची आठवण करून दिली. देशामध्ये आता लोकशाही राहिले की नाही? असा प्रश्न उपस्थित होत असताना हुकूमशाही पद्धतीने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून राजकीय हेतूने विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, निश्चितपणे हे देशाच्या लोकशाहीला घातक आहे, पण ज्यांनी ज्यांनी या देशावर जुलमी कारभार केला त्याच्या विरोधात मोठी लाट स्वातंत्र्य सैनिकांच्या रूपामध्ये उभी राहिली आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या रूपामध्ये हुकूमशाहीला नष्ट करण्याचे काम झालेलं आहे हा या देशाचा इतिहास आहे आणि या इतिहासाची निश्चितपणे पुनरावृत्ती होईल अशी आशा विश्वजित कदम यांनी बोलून दाखवली.
सरकार विरोधात आवाज उठवला गेला की लगेच आवाज उठवणाऱ्या विरोधात केंद्रीय यंत्रणा कारवाई करतात हा नजीकचा इतिहास आहे.सोनिया गांधी,राहुल गांधी यांनाही टार्गेट केलं जातं.सातत्याने त्याना देखील चौकशीसाठी बोलावलं जाते. विरोधक शिल्लकच ठेवायचा नाही हा चंग सत्ताधाऱ्यानी बांधलेला दिसतो आहे, पण विरोधक शिल्लक न ठेवणे ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असून देश हुकूमशाहीकडे वाटचाल करतोय की काय अशी भीती कदम यांनी बोलून दाखवली.
रौप्यपदक विजेता संकेत सरगरला अभिजीत कदम मेमोरियल फाउंडेशन लाखाची मदत
कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये रौप्यपदक विजेती कामगिरी करणाऱ्या सांगली येथील संकेत सरगरच्या कुटूंबाला अभिजीत कदम मेमोरियल फाउंडेशन कडून एक लाखाची मदत तर ज्या अकॅडमीमध्ये संकेतने सराव केला त्या दिग्विजय अकॅडमीला पाच लाखाची मदत काँग्रेस नेते आणि माजी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी जाहीर केली.
सांगली येथील संकेत सरगरच्या सांगलीतील अहिल्यादेवी होळकर चौकातील घरी काँग्रेस नेते आणि माजी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी भेट दिली. यावेळी संकेत सरगरचे प्रशिक्षक मयूर सिंहासने देखील उपस्थित होते. यावेळी संकेत सरगरच्या आई-वडिलांचे शिवाय वेटलिफ्टर असलेली संकेतची बहीण काजल सरगरचेही आणि तिच्या कामगिरीचे कौतुक केले.तसेच दिग्विजय अकॅडमी मधून पुढचा संकेत देखील घडावा अशी अपेशा व्यक्त करत या अकॅडमीला पाच लाखाची मदत कदम यांनी जाहीर केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Sanjay Raut Timeline : संजय राऊतांची 17 तास चौकशी, नंतर अटक! काल सकाळपासून मध्यरात्री अटकेपर्यंत नेमकं काय-काय घडलं?
- Sanjay Raut : संजय राऊतांवर ईडीची कारवाई, जाणून घ्या सकाळी सातपासून रात्री 12 पर्यंत काय घडलं
- Sanjay Raut Detained : नोटीस, चौकशी, ताब्यात; जाणून घ्या राऊतांवरील ईडी कारवाईचा दोन वर्षातील घटनाक्रम
- Aniket Nikam on Sanjay Raut : संजय राऊतांपुढे आता कोणते पर्याय? कायदेतज्ञ काय सांगतात?