सांगली : आम्ही सर्वजण सोबत, चांगल्या पद्धतीने जाऊ, काही काळजी करू नका, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विशाल पाटील यांच्या मातोश्री शैलजाभाभी पाटील यांच्याशी बोलताना व्यक्त केला. स्वागतासाठी आलेल्या वसंतदादा घराण्यातील शैलजाभाभी पाटील यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला.
उद्धव ठाकरे आज (21 मार्च) सांगली दौऱ्यावर असून त्यांच्या दौऱ्याकडे अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. सांगलीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे लोकसभेच्या जागेवरून रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे या जागेवरून उमेदवारीवर उद्धव ठाकरे भाष्य करणार का? याकडे लक्ष आहे. मिरजेत उध्दव ठाकरे यांचा जनसंवाद मेळावा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेत अभिवादन केले. काँग्रेसमधून वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील प्रमुख दावेदार असताना शिवसेना ठाकरे गटाकडून सांगली जागेवर दावा करत चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात तणाव निर्माण झाला आहे.
काँग्रेसचा ठाकरेंच्या मेळाव्यावर बहिष्कार
ठाकरे गटाने पश्चिम महाराष्ट्रातील एक जागा तरी आपल्याकडे असावी यासाठी सांगलीच्या जागेचा आग्रह धरला आहे. मात्र, सांगलीमधील काँग्रेस नेत्यांनी सांगलीची जागा सोडण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या