सांगली : अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचं लागून राहिलेल्या सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाने उमेदवारीची घोषणा केली आहे. चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर संजय राऊत शिक्कामोर्तब केलं आहे. संजय राऊत म्हणाले की, डबल इंजिन डबल आता सांगलीमध्ये फेल होणार असून ज्या विराट संख्येने इथं जमला आहात ते पाहून मला क्षणभर वाटलं की कुस्तीची दंगल सुरू आहे. कारण सांगली, कोल्हापूरला एवढी गर्दी कुस्तीलाच होते, पण माननीय उद्धवजी आले ते खास पैलवान चंद्रहारसाठी आले.



ते पुढे म्हणाले की, लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला जातो, संभ्रम काय आहे इथे कोण लढणार? या मैदानात चंद्रहारच लढणार, चंद्रहार जिंकणार आणि हा महाराष्ट्राचा महाराष्ट्र डबल केसरी त्याची विजयाची गदा घेऊन एका हातात मशाल घेऊन दिल्लीच्या संसदेत गेल्याशिवाय राहणार नाही ही गॅरंटी सभा देते. आजची सभा होणार नाही होणार नाही असे म्हणत होते पण सभा झाली. सभेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत आणि पुढील सभेला सगळे व्यासपीठावर सर्व नेते उपस्थित राहतील. 


त्यांनी सांगितले की सांगलीमध्ये प्रवेश केल्याबरोबर आम्ही सर्वप्रथम या सांगलीचा नव्हे, तर महाराष्ट्राचे भूषण स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाला भेट दिली. वसंतदादांचे आशीर्वाद घेतले, स्मारकावर विशाल पाटलांच्या मातोश्री शैला भाभी उपस्थित होत्या. त्यांनी शुभेच्छा दिल्या, पतंगराव कदम यांच्या कुटुंबाने शुभेच्छा दिल्या. जनतेनंही चंद्रहारला आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या आहेत. काकांना कुठेही पाठवा पण चंद्रहार मात्र दिल्लीत जाईल. त्याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या