सांगली: तासगावात एक संतापजनक घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईसह, बहिणीने आपल्या भावाचा खून (Sangli Crime News) करून त्याच्या मृतदेहाला आग लावली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला असल्याचा बनाव मायलेकीने रचला. आईसह बहिणीने भावाचा खून करून आगीत जळून मृत्यू झाल्याचा कांगावा केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मात्र तासगाव पोलिसांची (Sangli Crime News) चक्र वेगाने फिरली आणि या घटनेतील सत्य काही तासात समोर आणले. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे. (Sangli Crime News)

तासगाव शहरातील मयूर रामचंद्र माळी (वय वर्षे 30) या तरुणाला त्याची आई संगीता रामचंद्र माळी (वय वर्षे 50) आणि बहीण काजल रामचंद्र माळी (वय वर्षे 19) या दोघींनी आधी गुंगीचे औषध दिलं. त्यानंतर दोघींनी त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. खुनानंतर मृतदेह पेटवून दिला आणि आग लागून मृत्यू (Sangli Crime News) झाल्याचा बनाव त्याने केला. मात्र, तासगाव पोलिसांना संशय आल्याने, पोलिसांनी उलट तपासणी केली आणि त्यामध्ये आई आणि बहिणीने खून केल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तासगाव शहरातील कासार गल्ली येथील मयूर रामचंद्र माळी हा सामाजिक कार्यकर्ता होता. शुक्रवारी रात्री तो मित्रांसमवेत बोलत थांबला होता. नंतर तो घरी गेला. शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घरात आतील बाजूस आग लागल्याची (Sangli Crime News) घटना घडली. ही घटना समजताच तासगाव नगर परिषदेची अग्निशमनची गाडी घटनास्थळी दाखल झाली. आगीवर नियंत्रण मिळवले. त्यावेळी या आगीत होरपळून मयूर माळी याचा मृत्यू झाल्याचे घटनास्थळी निदर्शनास आले. (Sangli Crime News)

मयूर रामचंद्र माळी याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शिवविच्छेदनासाठी नेण्यात आला. त्यावेळी डोक्यात झालेल्या जखमा आणि घटनास्थळावरील परिस्थिती यामुळे पोलिसांचा या मृत्यू बाबतचा संशय बळावला, मयूरची आई संगीता आणि बहीण काजल यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी केलेल्या तपासात संगीता आणि काजल या दोघींनी मयूरला शनिवारी सकाळी गुंगीचे औषध देऊन, गुंगीत असतानाच त्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे निष्पन्न झाले. मयूरचे आई आणि बहिनी सोबत काही कारणांवरून सातत्याने वाद होत होते. या वादातूनच आई आणि बहिणीने मयूरचा खून केल्याचे निष्पन्न झाले असून अधिक तपास तासगाव पोलीस करत आहेत.