सांगली: साखरेची एमएसपी (किमान विक्री किंमत) लवकरच 4 हजार 200 रुपये प्रतिक्विंटल होणार आहे. याबाबत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याबरोबर दिल्लीत बैठक झाली असून, केंद्रीय मंत्रिमंडळात निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष  हर्षवर्धन पाटील (harshvardhan patil) यांनी दिली आहे. क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्या काही वर्षापासून ऊसाची केवळ एफआरपीच (Sugercane FRP)  वाढत आहे. असे असताना त्या तुलनेत साखरेचे दर मात्र वाढत नाहीत. यामुळे साखर कारखान्यांना मिळणारी तफावतीची रक्कम अत्यंत तुटपुंजी असल्याने कारखानदारी अडचणीत येत आहे. यामुळे साखर उद्योग वाचवायचा असेलतर साखरेचे किमान मूल्य प्रति क्विंटल 4 हजार 200 रुपये करण्यात यावे अशी मागणी 524सहकारी साखर कारखान्यांनी केलीय. तसा प्रस्ताव देखील केंद्रीय मंत्री मंडळासमोर आहे. लवकरच याला मंजुरी मिळेल असे देखील सहकारी साखर कारखाना संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.


ऊसाचा एफआरपी वाढत असताना त्या तुलनेत साखरेचे दर वाढत नाहीत. यामुळे साखर कारखान्यांना मिळणारी तफावतीची रक्कम तुटपुंजी असल्याने कारखानदारी अडचणीत येत आहे. सहकारी साखर कारखानदारीवर बरेच घटक अवलंबून असून रोजगारक्षम व्यवसाय आहे. यामुळे साखर उद्योग वाचवायचा असेल तर साखरेचे किमान मूल्य प्रति क्विंटल ४२०० रुपये करण्यात यावे अशी मागणी 524 सहकारी साख कारखान्याच्या राष्ट्रीय संघाने केली आहे. हा प्रस्ताव आता केंद्रिय मंत्रीमंडळासमोर आहे. लवकरच याला मंजुरी मिळेल, असे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले.


हर्षवर्धन पाटलांकडून इचलकरंजीची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी


पाकव्याप्त काश्मीरसारख्या इचलकरंजीमधून धैर्यशील माने यांनी विजयाचा दिवा लावला, अशी थेट तुलना भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. राजर्षी शाहूंच्या कोल्हापूर नगरीतील वस्त्रोद्योगनगरी अशी ओळख असलेल्या इचलकरंजीची थेट पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. 

लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सगळे माझ्यासोबत होते. परंतु काही अज्ञात शक्ती देखील माझ्यासोबत होत्या. त्यांची नावे घेतली तर अवघड होईल. परंतु 'होता जीवा म्हणून वाचला शिवा' असे सांगत धैर्यशील माने यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक अदृश्य शक्तींचे सहकार्य झाल्याचे स्पष्टोक्ती दिली. परंतु भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी मात्र इचलकरंजीला पाक व्याप्त काश्मीरची उपमा दिल्याने त्या विधानाची जोरदार चर्चा होत आहे. 


आणखी वाचा


Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड हिंसाचारावर शाहू महाराजांकडून तीव्र निषेध, संभाजीराजे म्हणाले, 'मी आक्रमक होतो, पण...'