Sangli : सांगलीत माजी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या विश्वजित युथ फौंडेशनने आयोजित केलेली दहीहंडी बदलापूरच्या श्री दत्तकृपा मंडळाने फोडली. ही दहीहंडी फोडण्याचा मान मिळवत सव्वा लाखाचे बक्षिस देखील पटकावले. विश्वजित कदम यांच्या हस्ते मंडळाला बक्षीस आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. विश्वजित कदम यांच्या बरोबर KGF फेम रामचंद्रा राजू( गरुडा)  आणि प्रसिद्ध सिनेकलाकार स्नेहलता वसईकर यांची या दहीहंडीस प्रमुख उपस्थित होती.


कोरोना संकटामुळे फौंडेशनतर्फे गेली दोन वर्षे दहीहंडी सोहळा घेता आला नाही. यंदा दहीहंडी सोहळा मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. सांगलीकरानी देखील प्रचंड संख्येने हजेरी लावत त्याला प्रतिसाद दिला. यावेळी तरुण भारत स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. श्री दत्तकृपा मंडळ बदलापूर, वंदे मातरम पुणे,जय महाराष्ट्र शिरोळ, गोडी विहीर शिरोळ या संघांनी या दहीहंडी उत्सवात सहभाग घेतला होता.


दत्तकृपा आणि वंदे मातरम मंडळांमध्ये पहिल्यापासूनच चुरस होती. सलामी दिल्यानंतर पाच पाच फुटांनी हंडी खाली घेण्यात आली. अखेर पावणे अकराच्या सुमारास सात थर उभारत श्री दत्तकृपा मंडळाने हंडी फोडत एक जल्लोष स्टेडियमवर केला. यामुळे मोठा उत्साह सांगलीकरांमध्ये दिसून आले. या मंडळाला एक लाख २५ हजार रूपयाचे बक्षिस दिले गेले.  


तरुण भारत स्टेडियमवर आयोजित दहीहंडीसाठी राज्यभरातून ७ गोविंदा पथक सहभागी झालेत. यामध्ये एका महिला गोविंदा पथकाचाही समावेश आहे. विश्वजित कदम यांच्या बरोबर KGF फेम रामचंद्रा राजू( गरुडा)  आणि प्रसिद्ध सिनेकलाकार स्नेहलता वसईकर यांची या दहीहंडीस प्रमुख उपस्थित होते. माजी कृषी राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वजित युथ फौंडेशनकडून या दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 


सिनेकलाकारांच्या उपस्थितीने अख्ख्या स्टेडियमवर जल्लोष


सिनेकलाकारांची उपस्थितीत अख्ख्या स्टेडियमवर जल्लोष संचारला होता. लेसर शो, फटाक्यांची आताषबाजीने आसमंत उजळला होता. अशा जल्लोषी वातावरणात बदालपूर (मुंबई) येथील दत्तकृपा मंडळाच्या जिगरबाज गोविंदांनी सात थरांचा मनोरा उभारत सांगलीतील मानाची दहीहंडी फोड सव्वा लाखाचे मानकरी ठरले. यावेळी माजी मंत्री, आमदार विश्‍वजित कदम यांच्यासह युवा नेते जितेश कदम, फौंडेशनचे अध्यक्ष उदय शिंदे यांच्यासह नगरसेवक मान्यवर उपस्थित होते.  


दरम्यान, केजीएफ चित्रपटातील गरूडा फेम अभिनेता रामचंद्रा राजू, मराठी वाहिनीवरील अभिनेत्री स्नेहलता वसईकर, प्रतिक्षा जाधव, झोया खान यांचा डान्सग्रुप आकर्षण ठरले. डॉल्बी साऊंड सिस्टीम, विशेष लेसर शो, बॉलीवूड डान्स ग्रुप ही दहीहंडीची वैशिष्ट्ये सांगलीकरांनी अनुभवली. फाउंडेशनचे पदाधिकारी नगरसेवक मयूर पाटील, प्रमोद सुर्यवंशी, अमित शहा, रहीम हट्टीवाले, विशाल कलगुटगी यांनी संयोजन केले.