सांगली: राज्यात सर्वदुर मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. अनेक भागात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील नद्या दुधडी भरून वाहत आहेत. सांगली, कोल्हापूर भागातील नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. नदी परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वारणा नदी बरोबरच कृष्णा नदीच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली आहे. वारणा नदी (Warana River) काठच्या गावांना फटका बसायला सुरुवात झाली आहे. वारणा काठी असलेल्या दुधगावजवळील रोडवर पाणी आल्याने दुधगावहुन कोल्हापूर जिल्ह्यात जाणारा रोड बंद करण्यात आला आहे.
वारणा नदीची वाढलेली पाणी पातळी आणि चांदोली धरणातून सुरू करण्यात आलेला विसर्ग यामुळे वाढण्याच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे . याचा आता वारणा नदी (Warana River) काठच्या गावांना फटका बसायला सुरुवात झाली आहे. वारणा काठी असलेल्या दुधगावजवळील रोडवर वारणा नदीचे पाणी आल्याने दुधगावरून कोल्हापूर जिल्ह्यात जाणारा रोड बंद झाला आहे. सांगली दुधगाव मार्गे- कोल्हापूर जिल्ह्याला जोडला जाणारा दूधगाव जवळील रस्तावर पाणी आल्यामुळे दुधगावकडून कोल्हापूर जिल्ह्याकडे जाणारा रोड बंद केला आहे. यामूळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
वारणा नदी बरोबरच कृष्णा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ
वारणा नदी (Warana River) बरोबरच कृष्णा नदीच्या (Krishna River) पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी 30 फुटांजवळ पोहचली आहे. कृष्णा नदी काठच्या नागरिकांचे स्थलांतर करण्यास सांगली महापालिकेकडून सुरुवात केली आहे. कर्नाळ रोडवरील आरवाडे पार्क भागातील 3 कुटूंब स्थलांतरित करण्यात आली आहेत, 9 मुलांसह 17 जणांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
अलमट्टी धरणातून दोन लाख क्यूसेक्स विसर्ग केला जाणार
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने (Heavy Rain) नद्या दुधडी भरून वाहू लागल्या आहेत. यामुळे आसपासच्या गावांना आणि वस्त्यांना मोठा धोका निर्माण होऊ नये यासाठी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधील वाढलेल्या नद्यांच्या पाण्याची पातळी कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अलमट्टी धरणातून थोड्या वेळात दोन लाख क्यूसेक्स विसर्ग केला जाणार आहेत. सांगली आणि कोल्हापूर जिल्हामधील वाढलेल्या नद्यांच्या पाण्याची पातळी कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
राज्यात मुसळधार पाऊस
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईसह कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे. आज रायगड आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर मुंबईसह ठाणे, पालघर, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर पुणे या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रात आज पावसाचा (Heavy Rain) यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, त्याचबरोबर विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.