Sangli News : गर्दीच्या आणि सार्वजनिक ठिकाणी सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा. तसेच सामाजिक अंतर राखून वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन सांगली जिल्ह्याचे (Sangli News) डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे. कोविड-19 आणि Influenza ची लक्षणे ही श्वसन संस्थेशी निगडीत असून त्यामध्ये खोकला, श्वास घेण्याचा त्रास, निमोनिया, ताप इत्यादी प्राथमिक लक्षणे आहेत. 


सरकारच्या निर्देशानुसार, या आजाराची व्याप्ती वाढू नये यासाठी सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सांगली जिल्ह्यातील सर्व प्रकारची शासकीय/निमशासकीय कार्यालये, तसेच बँका, शाळा, महाविद्यालये इत्यादी मधील सर्व शासकीय विभागातील अधिकारी/कर्मचारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर दैनंदिन करणे अनिवार्य आहे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत.


कोविड-19 विषाणूचा प्रसार हा प्रामुख्याने हवेवाटे त्याचप्रमाणे शिंकणे, खोकणे, हस्तांदोलन इत्यादी कारणामुळे होतो. या आजाराच्या अनुषंगाने 50 वर्षांवरील व्यक्ती, गरोदर माता, लहान बालके, मधुमेह, कॅन्सर आणि किडनीचे आजार असलेल्या तसेच ज्या नागरिकांना यापूर्वी कोविड-19 ची लागण ( (post covid) होऊन गेली आहे, अशा नागरिकांनी वेळोवेळी आणि जेवणापूर्वी नियमितपणे हात साबणाने स्वच्छ धुवावेत. शिंकताना, खोकताना नाक आणि तोंडावर रूमाल धरावा. हस्तांदोलन टाळावे, चेहरा, नाक आणि डोळे यांना वारंवार हाताने स्पर्श करू नये आणि गरज नसताना गर्दीच्या आणि बंदिस्त ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 


राज्यात कोरोनाचा वेग वाढला


दरम्यान, राज्यात गुरुवारी (6 एप्रिल) कोरोनाचे 803 नवीन रुग्ण आढळले. यासोबतच राज्यात तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य बुलेटिननुसार, राज्यातील कोरोना संसर्गाचा बरा होण्याचे प्रमाण 98.13 टक्के आहे. त्याचवेळी राजधानी मुंबईत आज एका रुग्णाच्या मृत्यूसह कोरोनाचे 216 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. नवीन रुग्णांसह, मुंबईतील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1268 वर पोहोचली आहे.


मुंबईत कोरोनाचे 216 नवे रुग्ण


राजधानी मुंबईत गेल्या 24 तासांत मुंबईत कोरोनाचे 216 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह, शहरात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1268 वर पोहोचली आहे. मुंबईत आज कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. मुंबईतील रुग्णालयांमध्ये सध्या एकूण 100 कोरोना रुग्ण दाखल आहेत, त्यापैकी 20 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. आज 19 नवीन रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. राज्यातील कोरोना रिकव्हरी 18.13 टक्के आहे.


महत्वाच्या इतर बातम्या :