सांगली : जिल्ह्यातील मिरज तालुक्यात असलेल्या म्हैसाळ (Sangli) येथे विजेचा शाँक लागून तीन जणांचा मुत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडलीय. या घटनेत एक जण जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज रविवारी सकाळी घडली. एकाच गावातील तीन युवकांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने म्हैसाळ गावावर शोककळा पसरली आहे. प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे वय (35),पारसनाथ वनमोरे वय (40),शाहीराज पारसनाथ वनमोरे वय (12)  अशी मृतांची  नावे आहेत. तर हेमंत वनमोरे (वय 15)हा युवक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधण्यात आला असून ग्रामस्थांनी महावितरणविरुद्ध (MSEB) संताप व्यक्त केला आहे.  

  


म्हैसाळ गावात वनमोरे कुटुंबीयांची शेती आहे. आपल्या शेतात दैनंदिन कामासाठी वनमोरे कुटुंबातील सदस्य दररोज ये-जा करत असतात. आज सकाळी शेतात पाणी पाजण्यासाठी पारसनाथ वनमोरे गेले होते. त्यावेळी वीजेची वायर तुटून शेतात पडली होती. मात्र, शेतातून चालत असताना त्यांच्या लक्षात न आल्याने पारसनाथ वनमोरे यांना शॉक लागून त्यांचा मुत्यू झाला. त्यावेळी त्यांचा मुलगा शाहीराज वनमोरे हा वडिल पारसनाथ यांच्याकडे गेला असता शाहीराजलाही वीजेचा जोरदार धक्का बसला. त्यामध्ये, त्याचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.  


दरम्यान,  शेतातून प्रदिप वनमोरे हे घटनास्थळी जात असताना त्यांना देखील शॉक लागून त्यांचा मुत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. एकाच कुटुंबातील तिघांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेत हेमंत वनमोरे हा तरुण जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळतात घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे  पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती घेतली. त्यानंतर, पंचनामा करुन सर्व मुतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच ही दुर्घटना घडली वनमोरे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे, या दुर्घटनेतील जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांकडून होत आहे.


हेही वाचा


शरद पवार माझ्यासाठी आदर्श,पण...; रोहित पवारांच्या मंत्रिपदावरुन प्रफुल्ल पटेलांचा खोचक टोला