सांगली : फक्त सांगली (Sangli Crime) नव्हे, तर राज्यात थरकाप उडवून देणाऱ्या 'रिलायन्स ज्वेल्स' सशस्त्र दरोड्यातील एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्यानंतर आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. सांगली पोलिसांकडून दरोड्यातील आरोपी अंकुरप्रताप रामकुमार सिंह (वय 25 वर्षे, रा. तारवान, जि. पाटणा, बिहार) याला बेड्या ठोकल्या होत्या. त्याला ओदिशामधून अटक करण्यात आली होती. 


शोरुममधील सीसीटीव्ही अंकुर प्रतापनेच बंद पाडले


पोलिस कोठडीत असलेल्या अंकुरकडून सखोल चौकशी सुरु आहे. चौकशीत त्याने धक्कादाक माहिती समोर आली आहे. दरोडा टाकण्यात आल्यानंतर शेवटा अंकुरप्रतापने शोरुममध्ये एन्ट्री करत पुरावे नष्ट करण्यासाठी सीसीटीव्ही बंद केले होते. तो पेशाने इलेक्ट्रिशियन असल्याने त्याला यामधील चांगलीच माहिती होती. त्यामुळे त्याने सीसीटीव्ही बंद करून डीव्हीआर ताब्यात घेतले होते. ते घेऊन जात असतानाच गोळीबार झाल्याने पिशवी हातातून पडली होती. त्यानंतर त्यांनी पलायन केले होते. यावेळी वापरण्यात आलेल्या कारचा चालक सुद्धा अंकुरप्रतापच होता. 


कट कोल्हापूर आणि नांदेडात शिजला 


अंकुरने अजून बऱ्याच उलगडा होण्याची शक्यता आहे. ज्वेल्सवरील सशस्त्र दरोड्याची तयारी त्यांनी कोल्हापूर आणि नांदेडमधून केल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. पोलिसांनी या दरोड्यातील संशयित म्हणून गणेश उद्धव बद्रेवार (हैदराबाद), प्रताप अशोकसिंह राणा (बिहार),  कार्तिक नंदलाल मुजुमदार (पश्चिम बंगाल) आणि पिन्स कुमार सिंह (बिहार) यांची नावे जारी केली आहेत. 


सांगली पोलिसांचा परराज्यात 50 दिवस तळ ठोकला 


दरम्यान, या सशस्त्र दरोड्याची उकल करण्यासाठी सांगली पोलिसांनी परराज्यात 50 दिवसांपेक्षा जास्त काळ राहून आरोपीचे धागेदोरे शोधून काढले आहेत. आरोपी अंकुरप्रतापला 10 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 4 जून रोजी भर दुपारी सात ते आठ जणांच्या टोळीने मार्केट यार्डजवळ असलेल्या रिलायन्स ज्वेल्स या सराफी दुकानावर सशस्त्र दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी पोलिस असल्याची बतावणी करत पिस्तूलाच्या धाकाने दुकानातील तब्बल साडे सहा कोटींचे दागिने, महागडे हिरे, रोकड लंपास केले होते. यावेळी दरोडेखोरांनी गोळीबारही केला होता. त्यानंतर दरोडेखोर टाटा सफारी (क्र. एमएच 04 ईटी 8894) या गाडीतून तसेच दोन दुचाकीवरुन ते पसार झाले होते.


इतर महत्वाच्या बातम्या :