आटपाडी: बारावीच्या चाचणी परीक्षेमध्ये कमी मार्क मिळाल्यामुळे शिक्षक असलेल्या बापानेच पोटची लेक साधना (वय 17) हिला लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली. यात तिचा मृत्यू झाल्याची (Sangli Crime News) घटना शुक्रवारी नेलकरंजी (ता. आटपाडी) येथे घडली आहे. याप्रकरणी वडील धोंडीराम भोसले याला काल (रविवारी) अटक करण्यात आली आहे. याबाबत मुलीची आई प्रीती भोसले यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.(Sangli Crime News)

Continues below advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी साधना ही आटपाडीत बारावीमध्ये विज्ञान शाखेत शिकत होती. तर वडील हे मुख्याध्यापक आहेत. साधना हिला बारावीमध्ये चाचणी परीक्षेत कमी मार्क मिळाले. वडील धोंडीराम भोसले यांना ही माहिती समजताच ते संतापले. शुक्रवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास साधनाला घरातच लाकडी खुंट्याने मारहाण केली. बारावीतील चाचणी परीक्षेत कमी गुण कसे पडले? म्हणून धोंडीराम यांनी रागाच्या भरात हा अमानुष मारहाण केली. या मारहाणीत साधना ही गंभीर जखमी झाली. त्यातच साधनाचा मृत्यू झाला. 

पप्पा, तुम्ही कुठे कलेक्टर झालात?

पप्पा, तुम्ही कुठे कलेक्टर झालात तुम्हालाही कमीच मार्क पडले होते ना? असं उलट उत्तर साधनाने दिल्याने संतापलेल्या बापाने अमानुष मारहाण केली या घटनेत मुलीचा मृत्यू झाला आहे. सांगलीच्या आटपाडीतील नेलकरंजी येथे ही घटना घडली आहे.साधना भोसले ही बारावीमध्ये शिक्षण घेत होती. डॉक्टर बनण्याचे तिचं स्वप्न होतं. मात्र, तिला नीटच्या चाचणी परिक्षेत कमी मार्क मिळाले होते. त्यामुळे तिचे वडील मुख्याध्यक धोंडीराम भोसले हे संतापले होते. साधना ही आपटपाडीमधील विद्यालयात राहत होती. दोन दिवसांपूर्वी ती घरी नेलकरंजी येथे गेली होती. त्यावेळी नीट परिक्षेच्या चाचणी परिक्षेत कमी गुण मिळाल्याने तिला मुख्यापध्यापक पित्याने जात्याच्या लाकडी खुंट्याने रात्री बेदम मारहाण केली होती. 

Continues below advertisement

वडील योग दिन साजरा करण्यासाठी शाळेत अन्...

 घटनेमध्ये साधना गंभीर जखमी झाली होती. परंतु त्यानंतर तिला रुग्णालयात उपचारासाठी न नेता दुसर्‍या दिवशी सकाळी तिचे वडील योग दिन साजरा करण्यासाठी शाळेत निघून गेले. साधनाचे वडील घरी आल्यानंतर त्यांना साधना बेशुद्ध अवस्थेत दिसून आली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. साधना हुशार होती. तिला दहावीमध्ये 95 टक्के गुण मिळाले होती. डॉक्टर बनण्याचे तिचे स्वप्न होते. परंतु केवळ नीटच्या चाचणी परिक्षेत कमी गुण मिळाले म्हणून मुख्याध्यापक वडिलांकडूनच झालेल्या मारहाणीत तिचा हकनाक बळी गेला. याप्रकरणी धोंडीराम भोसले याला आटपाडी पोलिसांनी अटक केलीये. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर पोटच्या लेकीला अशी अमानुष मारहाण करणाऱ्या बापाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.