सांगली : सांगली जिल्ह्यातील (Sangli Crime) कडेगाव तालुक्यात वांगी गावात दोन दिवसापूर्वी एका घराला 11 केव्हीचा करंट देऊन संपुर्ण कुटूंब संपवण्याचा प्रयत्न झालेल्या घटनेचा उलघडा झाला आहे. थरकाप उडवणाऱ्या या घटनेतील चिंचणी वांगी पोलिसांनी गावातील एका व्यक्तीस अटक केली. गजानन शामराव बडार (वय 37 रा. वांगी) असे इसमाचे नाव असून पोलिस तपासात या व्यक्तीनेच स्पष्ट झालं आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गजानन बडार यानेच तक्रार दिलेल्या कुटुंबातील लोक विजेचा शॉक लागून सर्वजण ठार होतील, या उद्देशाने वायर घराला अडकवल्याचे स्पष्ट झाले. 


शशिकांत वडार आणि गजानन वडार हे दोघे सावत्र भाऊ आहेत. यामधील शशिकांत वडारचे निकम कुटुंबाशी चांगले संबंध आहेत. यामध्ये शशिकांत आणि गजानन वडारमध्ये वडीलार्जित जमिनीचा काही दिवसापासून वाद सुरु होता. या वादाचा निकाल हा शशिकांत वडार यांच्या बाजूने लागला. त्यामुळे या कामात सुरज निकम यांनी शशिकांत वडार यांना मदत केल्याचा संशय आरोपी गजानन वडारला होता. या रागातून गजानने हे कृत्य केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. या गुन्ह्याचा तपास चिचणी वांगी पोलीस स्टेशनचे सहा. पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलिस अंमलदार हरिदास पवार,  संपत जाधव, दीपक यादव, गणेश तांदळे यांनी केला. 


घरालगत जाळ झाल्याने जाग आली


दरम्यान, अशोक निकम हे वांगी गावात कुटुंबासह राहतात. रात्रीच्या वेळी निकम आपली पत्नी व दोन मुलांसह जेवण करून झोपी गेले. रात्री एक वाजता अचानक घरासमोर विजेचा मोठा जाळ झाला व घरातील लाईट गेली. मात्र, घराजवळ ट्रान्सफार्मर असल्यामुळे त्यांनी ट्रान्सफार्ममध्ये जाळ झाला असेल समजून दुर्लक्ष केले. मात्र, दुसऱ्यांदा वीज आल्यानंतर घरालगत जाळ झाल्यामुळे त्यांनी घरातील सर्वांना जागे केले. 


निकम कुटुंब सहीसलामत बचावले


बॅटरीच्या सहाय्याने बाहेर पाहिल्यास त्यांना विज वाहक तार घराच्या दरवाजाजवळ अडकवलेली दिसून आली. 11 केव्ही या तारेतून घराच्या पुढील व मागील दरवाजास विद्युत वाहक तारेने कंरट दिल्याचे दिसून आले. अज्ञात लोकांनी कंरट दिलेली वायर काढून घेऊन जाण्यासाठी त्या वायरला एक हजार फूट लाब हिरव्या रंगाची नायलॉन रशी बांधून ती उसातून जोडून ठेवली होती. घरातील लोक बाहेर आल्यावर अज्ञात ती रस्सी ओढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, ते त्यात अयशस्वी झाले अन् घटनास्थळापासून पलायन केले. या प्रकरणातून निकम कुटुंब सहीसलामत बचावले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या