Sangli ZP elections 2022: सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य आरक्षण काढण्यात आले आहे. जिल्हा परिषद निवडणूक विभागाचा प्रस्ताव तयार करण्याकरीता आणि आरक्षित निवडणूक विभाग निश्चितीकरीता आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत प्रक्रिया संपन्न झाली.
उपजिल्हाधिकारी (महसूल) मोहिनी चव्हाण यांनी निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेलया सुचनांनुसार आरक्षण सोडतीची सविस्तर माहिती सादरीकरणाव्दारे उपस्थित विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना दिली. जिल्हा परिषदेचे एकूण 68 गट आहेत. या गटांसाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार चिठ्ठी पध्दतीने आरक्षण निश्चित करण्यात आले. यावेळी कुमार रितेश चित्रुट याच्याहस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यानुसार जिल्हा परिषद निवडणुक गट पुढीलप्रमाणे आरक्षित करण्यात आले.
प्रवर्गनिहाय आरक्षण एकूण 68
- सर्वसाधारण - 21
- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग - 09
- अनुसूचित जाती - 04
- सर्वसाधारण महिला - 2
- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला - 09
- अनुसूचित जाती महिला - 04
तालुकानिहाय आरक्षित निवडणूक विभागाचा क्रमांक, नाव व कंसात आरक्षणाचा प्रवर्ग पुढीलप्रमाणे.
आटपाडी तालुका - (1) दिघंची (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), (2) आटपाडी (सर्वसाधारण महिला), (3) करगणी (सर्वसाधारण), (4) निंबवडे (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), (5) खरसुंडी (अनुसूचित जाती).
जत तालुका - (6) जाडरबोबलाद (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), (7) उमदी (सर्वसाधारण महिला), (8) करजगी (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), (9) संख (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), (10) माडग्याळ (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), (11) शेगाव (अनुसूचित जाती महिला), (12) वाळेखिंडी (सर्वसाधारण), (13) डफळापूर (सर्वसाधारण महिला), (14) बिळूर (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), (15) मुचंडी (सर्वसाधारण).
खानापूर तालुका - (16) नागेवाडी (सर्वसाधारण महिला), (17) लेंगरे (सर्वसाधारण महिला), (18) करंजे (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), (19) भाळवणी (सर्वसाधारण महिला).
कडेगाव तालुका - (20) तडसर (सर्वसाधारण), (21) कडेपूर (सर्वसाधारण महिला), (22) वांगी (अनुसूचित जाती महिला), (23) देवराष्ट्रे (सर्वसाधारण). तासगाव तालुका - (24) मांजर्डे (सर्वसाधारण महिला), (25) सावळज (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), (26) चिंचणी (सर्वसाधारण), (27) विसापूर (सर्वसाधारण महिला), (28) येळावी (सर्वसाधारण), (29) कवठेएकंद (सर्वसाधारण), (30) मणेराजुरी (सर्वसाधारण).
कवठेमहांकाळ तालुका - (31) ढालगांव (सर्वसाधारण), (32) कुची (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), (33) देशिंग (अनुसूचित जाती महिला), (34) रांजणी (अनुसूचित जाती).
पलूस तालुका - (35) कुंडल (सर्वसाधारण), (36) सावंतपूर (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), (37) दुधोंडी (सर्वसाधारण महिला), (38) अंकलखोप (सर्वसाधारण), (39) भिलवडी (सर्वसाधारण महिला).
वाळवा तालुका - (40) रेठरेहरणाक्ष ( सर्वसाधारण महिला), (41) बोरगाव (अनुसूचित जाती महिला), (42) नेर्ले (सर्वसाधारण महिला), (43) कासेगाव (सर्वसाधारण), (44) वाटेगाव (सर्वसाधारण), (45) पेठ (सर्वसाधारण), (46) वाळवा (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), (47) बावची (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), (48) कुरळप (सर्वसाधारण), (49) चिकुर्डे (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), (50) बहादूरवाडी (अनुसूचित जाती), (51) बागणी (सर्वसाधारण). शिराळा तालुका - (52) पणुंब्रे तर्फे वारूण (सर्वसाधारण), (53) वाकुर्डे बु (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), (54) कोकरूड (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), (55) सागांव (सर्वसाधारण महिला), (56) मांगले (सर्वसाधारण).
मिरज तालुका - (57) भोसे (सर्वसाधारण), (58) एरंडोली (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), (59) आरग (सर्वसाधारण), (40) मालगांव (सर्वसाधारण महिला), (61) कवलापूर (सर्वसाधारण महिला), (62) बुधगांव (अनुसूचित जाती), (63) नांद्रे (सर्वसाधारण महिला), (64) कसबे डिग्रज (सर्वसाधारण महिला), (65) कवठेपिरान (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), (66) हरिपूर (सर्वसाधारण महिला), (67) म्हैसाळ (एस) (सर्वसाधारण महिला), (६८) बेडग (सर्वसाधारण महिला