Sangli News : शेतकऱ्यांनी गहाण ठेवलेल्या सोन्याच्या वजनात घट (Reduction weight of gold)आढळून आल्याचा प्रकार सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कवठेएकंद शाखेत (Sangli District Central Cooperative Bank Kavathe Ekand Branch) समोर आला आहे. एक दोन नव्हे तर तब्बल 200 शेतकऱ्यांनी (Farmers) या शाखेत सोन्याच्या पिळ्याच्या अंगठ्या गहाण ठेवल्या होत्या. त्यामुळं प्रत्येकाच्याच बाबतीत असा प्रकार घडला आहे का? असाही प्रश्न आता उपस्थित जातोय. दरम्यान, सध्या ज्यांनी बँकेकडे तक्रार केली आहे, त्या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ (Shivaji Rao Wagh) यांनी सांगितले आहे.
प्रकरणाची चौकशी सुरु, अधिकाऱ्यांची माहिती
बँकेत गहाण ठेवलेल्या सोन्याच्या वजनात घट आल्यानं शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. आता याप्रकरणी चौकशीही सुरु करण्यात आल्याची माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, यातील पहिले तक्रारदार हे कवठेएकंद मधील विश्वासराव माधवराव पाटील हे होते. त्यांनी कवठेएकंद शाखेत सोन्याची अंगठी गहाण ठेवली होती. 12 एप्रिल रोजी त्यांनी दागिने सोडवल्यानंतर त्यात घट झाल्याचे त्यांना आढळून आले. हे प्रकरण सुरू असतानाच आणखी एका कर्जदार ग्राहकानेही बँकेमध्ये गहाण ठेवलेल्या दोन पिळ्याच्या अंगठीचे वजन कमी भरल्याची तक्रार केली आहे. या घटनेमुळं शेतकरी चिंतेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: